AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : असे लोक मृत्यूनंतरही जिवंत राहतात, चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलंय?

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत होते, चाणक्य यांच्या मते असे काही लोक असतात जे मृत्यूनंतरही लोकांच्या मनात कायम जिवंत असतात. त्या लोकांना समाज कधीही विसरत नाही. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : असे लोक मृत्यूनंतरही जिवंत राहतात, चाणक्य यांनी नेमकं काय सांगितलंय?
chanakya niti Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 08, 2026 | 7:29 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की समाजामध्ये तुम्हाला विविध स्वभावाचे लोक भेटतात. काही लोक हे स्वार्थी असतात, तर काही लोक हे धूर्त मनाने कपटी असतात. तर काही लोक हे मनाने खूप चांगले असतात. गरज असेल तर असे लोक नेहमी इतरांच्या मदतीला धावून जातात. ज्या लोकांचा स्वभाव हा धूर्त असतो, कपटी असतो, जे लोक छोट्या-छोट्या फायद्यांसाठी देखील इतरांची फसवणूक करण्यास मागे -पुढे पहात नाहीत. असे लोक समाजात बदनाम होतात. एक वेळ तर अशी येते की अशा लोकांवर कोणीही विश्वास ठेवत नाही, असे लोक जिवंतपणीच समाजासाठी मेलेले असतात. तर या समाजात असे देखील काही लोक असतात जे आपल्या स्वभावामुळे सर्वांची मने जिंकून घेतात, कधीही कोणाचं नुकसान करत नाहीत, असे लोक जिवंतपणी सर्वांना हवेच असतात, मात्र जेव्हा अशा लोकांचा मृत्यू होतो, तेव्हा देखील समजा या लोकांना कायम लक्षात ठेवतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

कर्म – चाणक्य म्हणतात समाजात कर्माला खूप महत्त्व आहे. या ठिकाणी एक लक्षात ठेवा की जेव्हा तुमचा मृत्यू होतो, तेव्हा तुम्ही सर्व गोष्टी पाठिमागे ठेवता. मात्र कर्म ही एक अशी गोष्ट आहे, जी मृत्यूनंतरही तुमच्यासोबतच असते. कर्मामधून कधीही व्यक्तीची सुटका होत नाही. त्यामुळे माणसाने आपले कर्म नेहमी चांगले ठेवावेत. जो माणूस आपल्या आयुष्यात वाईट कर्म करतो, लोकांची फसवणूक करतो. चुकीच्या पद्धतीने धन कमावतो, अशा लोकांना समाजात कधीही आदराचं स्थान नसतं. तसेच त्याचा मृत्यू झाल्यानंतर देखील समाज त्याला लक्षात ठेवत नाही, अशा लोकांकडे नेहमी दुर्लक्ष होतं. मात्र ज्याचे कर्म चांगले असतात, जो लोकांची कधीही फसवणूक करत नाही, चांगल्या मार्गाने धन कमावतो, गरजू लोकांना दान करतो, अशा लोकांना समाज कायम लक्षात ठेवतो.

अशा लोकांचा जेव्हा मृत्यू होतो, मृत्यूनंतर देखील शेकडो वर्ष अशी लोक कायम समाजाच्या मनात, त्यांच्या विचारने जिवंत असतात. अशा लोकांचे विचार हे येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देण्याचं काम करतात. तुम्ही कर्म काय केलं त्यावर तुमची किर्ती अवलंबून असते. त्यामुळे आयुष्यात नेहमी आपले कर्म चांगले ठेवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. ज्या माणसाचे कर्म चांगले असतात तो मृत्यूनंतरही कायम लोकांच्या मनात राहतो, असं चाणक्य यानी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी