AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुरुषांच्या याच त्या सवयी; महिला होतात Impress, तुमच्याकडे आहेत का हे गुण?

Chanakya Niti : पुरुषांच्या या सवयींवर महिला फिदा होतात. महिलांच्या सौंदर्यावर पुरूष भाळतात. पण महिला या मानसिकरित्या आणि भावनिकदृष्ट्या पुरूषांच्या जोडल्या जातात. त्यामुळे ज्या पुरुषांकडे हे गुण असतात, त्यांच्यावर महिला लट्टू होतात. कोणते आहेत ते गुण?

पुरुषांच्या याच त्या सवयी; महिला होतात Impress, तुमच्याकडे आहेत का हे गुण?
याच त्या सवयी, महिला होतात फिदाImage Credit source: गुगल
| Updated on: May 04, 2025 | 3:37 PM
Share

चाणक्या नीतीनुसार, पुरूषांच्या काही सवयी महिलांची कमजोरी ठरतात. ‘यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते, निघृष्णच्छेदनतपद्नैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते, श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा।’ या एका श्लोकात चाणक्याने पुरूषांच्या त्या सवयींचा उल्लेख केला आहे. या सवयींमुळे पुरूष महिलांच्या दृष्टीने त्यांचे रिअल हिरो ठरतात. कोणत्या आहेत त्या सवयी? कशा ठरतात खास?

इमानदारी : आता ही एक कठीण अट असते. पुरूष इमानदारीत कमजोर असतात, असे म्हटल्या जाते. जर एखादा पुरूष नात्यात इमानदार नसेल तर महिला नाराज होतात. पण जे पुरूष प्रामाणिक राहतात, त्यांच्यावर महिला फिदा होतात. पुरुषांवर शंका घेणे, त्यांच्यावर शक घेणे यात महिला तरबेज असतात. त्यांना सहजा सहजी पुरुषाला मोकळे सोडायचे नसते. जर पुरूष इमानदार नसेल तर महिला अशा पुरूषाचा आदर करत नाही.

चांगली वागणूक : चाणक्य नीतीनुसार, महिला पुरूषांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करतात. जर पुरूष दुसर्‍या स्त्रीसोबत चांगला व्यवहार करत असेल तर महिलेला ही बाब रूचत नाही. त्यांच्यात त्यावरून वाद होऊ शकते. नात्यात दुरावा येऊ शकतो. पुरूष भांडकुदळ, किरकिरा, टोमणे मारणारा असेल तर महिला या स्वभावाला कंटाळतात. आपल्या माणसानं आपुलकीने दोन शब्द बोलावे इतकीच तिची अपेक्षा असते.

चांगला श्रोता : महिला अनेक विषयांवर मत व्यक्त करतात. त्यांना रोजच्या जीवनातील बारीक-सारीक गोष्टी सांगण्यात स्वारस्य असते. महिला त्या पुरुषांवर फिदा असतात जो चांगला श्रोता असतो. जो पुरूष गर्विष्ठ असतो आणि तो चुकीवर सहज माफी मागतो, असे पुरूष सुद्धा त्यांना आवडतात. त्यामुळे महिलेच्या चांगल्या गोष्टी ऐका आणि त्याचे अधुनमधून कौतुक सुद्धा करा.

आत्मसन्मान महत्त्वाचा : नाते कोणतेही असो, जो महिलांचा आत्मसन्मान करतो, असा पुरूष महिलांना आवडतो. त्या त्याची स्तुती करतात. जर एखाद्याने महिलेच्या आत्मसन्मानाला धक्का लावला तर असे नाते फार काळ टिकत नाही. महिलांना त्यांचा आत्मसन्मान महत्त्वाचा असतो. आवडता पुरूष जर तिला दुखावत असेल तर तिला ते सहन होत नाही.

डिस्क्लेमर : इंटरनेटवर उपलब्ध स्त्रोतावरून ही माहिती देण्यात आली आहे. टीव्ही ९ याविषयीची कोणताही दुजोरा देत नाही. दावा करत नाही. 

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...