Chanakya Niti – या पाच खास नीती बनवतील तुम्हाला श्रीमंत, चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवानं आपल्या जीवनाचं व्यवस्थापन कसं करावं? हे खूप सोप्या भाषेत समजून सांगितलं आहे. आज आपण अशाच काही नीतींबद्दल जाणून घेणार आहोत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, कुटनीती तज्ज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवानं आपल्या जीवनाचं व्यवस्थापन कसं करावं? याबद्दल खूप सोप्या भाषेत समजून सांगितलं आहे. मानसाने कुठे बोलावं? कुठे गप्प राहावं? पैसे कुठे खर्च करावेत? पैसे कुठे बचत करावेत? मुलांवर संस्कार कसे करावेत? अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात असे काही गुण असतात जे कोणत्याही व्यक्तीमध्ये असतील तर असा व्यक्ती कितीही गरीब असला तर तो शुन्यातून जग उभारू शकतो. असा व्यक्ती श्रीमंत बनू शकतो. चला तर मग जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल.
वेळेची किंमत – चाणक्य म्हणतात जे लोक वळेची किंमत करतात, ते आयुष्यात नक्कीच यशस्वी होतात. लक्षात ठेवा गेलेली वेळ कधीच येत नाही. त्यामुळे प्रत्येक काम हे वेळेतच केलं पाहिजे. कोणतंही काम उद्यावर ढकलू नका, परिस्थिती कशी असो, तुम्ही एकदा एखाद्या कामाचा निश्चिय केला की लगेच त्या कामाला सुरुवात करा, असा सल्ला चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये दिला आहे.
रणनीती – चाणक्य म्हणतात तुम्हाला जे काम करायचं आहे, त्याची सर्वात आधी रणनीती ठरवा, कुठल्याही कामाची रणनीती ठरवताना आपलं हे काम कशासाठी करत आहोत, या कामातून आपला किती फायदा होणार आहे? फायदा वाढवण्यासाठी काय करता येईल? हे काम आपल्याला किती दिवसांमध्ये पूर्ण करायचं आहे? या गोष्टी लक्षात घ्या, असं चाणक्य म्हणतात.
योजना गुपीत ठेवा – चाणक्य म्हणतात तुम्ही जी योजना बनवली आहे, ती योजना तोपर्यंत कोणालाच सांगू नका, जोपर्यंत तुम्हाला त्यामध्ये यश मिळत नाही.
नियोजन – चाणक्य म्हणतात कुठल्याही कामात नियोजना खूप महत्त्व असतं, योग्य नियोजनाशिवाय कोणतंही काम पूर्ण होऊ शकत नाही.
संयम – चाणक्य म्हणतात आयुष्यात संयम या शब्दाला खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला अपयश आलं असेल तर संयम ठेवा आणि पुन्हा कामाला लागा, एक दिवस तुम्हाला यश मिळणारच आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
