AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : या सवयी अत्यंत धोकादायक, पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी माणसाने आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.

Chanakya Niti : या सवयी अत्यंत धोकादायक, पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, चाणक्य काय म्हणतात?
ChanakyaImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 05, 2026 | 8:51 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना योग्य मार्ग दाखवण्याचं काम करतात. चाणक्य म्हणतात अशा काही सवयी असतात ज्या पुरुषांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. या सवयींमुळे संसारचं वाटोळं होतं, त्यामुळे पुरुषांनी अशा सवयींचा वेळीच त्याग केला पाहिजे, त्यातच हीत आहे. चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हणतात आळस ही देखील याच सवयींपैकी एक सवय आहे. आळस हा माणसाचा सर्वात मोठा आणि धोकादायक शत्रू असतो. जो माणूस आपल्या आयुष्यात आळस करतो, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. असा माणूस कधीही आपल्या आयुष्यात प्रगती करू शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात अशा कोणत्या सवयी आहेत, ज्यामुळे माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, आणि चाणक्य काय म्हणतात? त्याबद्दल.

अंहकार – चाणक्य म्हणतात असा या जगात कोणीही शोधून सापडणार नाही, ज्याच्या मनात अंहकार नाही. परंतु जेव्हा तुमच्या मनातील अंहकार हा पीक पॉइंटला पोहोचतो, तेव्हा मात्र तुमची पीछेहाट व्हायला सुरुवात होते. अंहकारामध्ये माणूस एवढा आंधळा होतो, की काय चांगलं आणि काय वाईट याचं भानच त्याला रहात नाही. जो माणूस अंहकारी आहे, असा माणूस आपल्या हाताने आपलं वाटोळं करून घेतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

गरजेपेक्षा जास्त खर्च – चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला आपल्या गरजेपेक्षा जास्त खर्च करण्याची सवय आहे, अशा व्यक्तीच्या हातात कधीही पैसा टिकत नाही. असा व्यक्ती कधीही पैसा बचत करत नाही. त्यामुळे संकट काळात अशा व्यक्तींच्या हातात पैसा शिल्लक नसतो, त्यामुळे जे पुरुष गरजेपेक्षा जास्त पैसा खर्च करतात ते हाताने संकट ओढून घेतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

वाईट संगत – चाणक्य म्हणतात जे पुरुष वाईट संगतीला लागतात, त्यांचा संसार उद्ध्वस्त होतो. त्यामुळे कधीही माणसाला वाईट संगत असू नये, आपण कोणाच्या संगतीत आहोत, हे आपण आयुष्य तपासून पाहिलं पाहिजे, असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?