Chanakya Niti : हे दोन लोक आयुष्यात कधीच यशस्वी होत नाहीत, पाहा चाणक्य काय सांगतात?
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. या गोष्टी आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आज आपण चाणक्य यांचे असेच काही विचार जाणून घेणार आहोत.

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले ते विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात, मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात ज्या व्यक्तीला आयुष्यात वेळेचं गणित कळतं तो व्यक्ती यशस्वी होतो. प्रत्येक गोष्टीची विशिष्ट वेळ असते, त्या -त्या वेळेत जर त्या गोष्टी झाल्या तर यश तुम्हाला मिळतंच. परंतु तुम्ही जर वेळ चुकवली तर ती वेळ पुन्हा कधी तुमच्या आयुष्यात येत नाही आणि तुम्ही अपयशी होतात. तसेच तुम्हाला जर यश पाहिजे असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे संयम. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुमचा वाईट काळ सुरू असतो तेव्हा कधीही खचून जाऊ नका. संयम ठेवा, आणि जेव्हा तुमची चांगली वेळ येते तेव्हा अधिक जोमाने कामाला लागा यश तुम्हाला नक्की मिळेल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य पुढे म्हणतात की या जगात दोन लोक कधीच यशस्वी होत नाहीत, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
विचार करूनही कृती न करणारे लोक – चाणक्य म्हणतात समाजात असे अनेक लोक असतात, जे खूप विचार करतात मात्र कृतीच करत नाहीत. म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या कामाची सुरुवात करायची असते, तो त्याबद्दल प्रचंड विचार करतो, परंतु कृतीच करत नाही. असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात अपयशी होतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
विचार न करता काम करणारे लोक – चाणक्य म्हणतात जसे काही लोक हे खूप विचार करतात, परंतु कृती काहीच करत नाहीत. तसेच काही लोक हे कोणताही विचार न करता कृती करतात, असे लोक देखील अपयशी होतात. जेव्हा तुम्ही कोणताही विचार न करता एखादं काम सुरू करात त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता खूप कमी असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)