
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये त्यांनी व्यक्तीनं आदर्श जीवन कसं जगाव? याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचा चाणक्य निती हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शक ठरतो. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टींवर चर्चा केली आहे, ज्या गोष्टी दैनंदीन आयुष्यामध्ये व्यक्तीला उपयोगी पडतात. आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये जगातील महापाप कोणतं आहे? हे देखील सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात ही चूक अशी आहे की, या चुकीला देव सुद्धा कधीच माफ करत नाही. जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते?
आर्य चाणक्य म्हणतात आई-वडील हे देवाचं दुसरं स्वरुप असतात. आदर्श मुलाचं कर्तव्य आहे की, त्याने आपल्या आई-वडिलांची सेवा करावी. आई वडिलांमुळेच हे सुंदर जग मुलांना पाहायला मिळतं. आई वडिलांचे मुलांवर अनंत उपकार असतात. आई वडील आयुष्यभर मेहनत करून आपल्या मुलांना स्वत:च्या पायावर उभा करतात. त्यामुळे मुलाचं देखील हे कर्तव्य आहे की, म्हातारपणात आपल्या आई वडिलांचा चांगला सांभाळ करावा.
म्हतारपणात आई वडिलांना त्रास देणं, त्यांना घराच्या बाहेर काढणं, त्यांचा छळ करणं हे जगातील सर्वात महापाप आहे, असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे. ते म्हणतात हे असं पाप आहे, ज्याला देव देखील कधीच क्षमा करत नाही. याची किंमत त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात चुकवावी लागते. त्यामुळे आई -वडिलांचा सांभाळ मुलांनी चांगल्या पद्धतीनं करावा, हेच आदर्श मुलांचं लक्षण आहे.
दरम्यान आर्य चाणक्य यांनी आपल्या या ग्रंंथामध्ये आदर्श पती कसा असावा, आदर्श पत्नीची लक्षणं काय आहेत. मित्र कोणाला म्हणावं, शत्रू कसा ओळखावा, आयुष्यात काय करू नये काय करावं? अशा एकना अनेक विषयांवर मार्गदर्शन केलं आहे, आजही चाणक्य यांचे विचार अनेकांना प्रेरणा देतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)