AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचयं? मग चाणक्य म्हणतात गरुडाकडून या गोष्टी शिकाच

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात निसर्गामध्ये अशा अनेक गोष्टी असतात, ज्यांच्यापासून आपण काही न काहीतरी शिकलं पाहिजे. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं आहे, तर तुम्ही गुरुडाचे गुण आत्मसात केले पाहिजेत.

Chanakya Niti : आयुष्यात यशस्वी व्हायचयं? मग चाणक्य म्हणतात गरुडाकडून या गोष्टी शिकाच
CHANKYAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 01, 2026 | 9:06 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही मानसाला आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देतात. एखादा माणूस आपल्या आयुष्यात हरला असेल तर त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम चाणक्यांचे हे विचार करतात. माणसानं आदर्श जीवन कसं जगावं? आपल्या आयुष्यात काय करावं? आणि काय करू नये? याचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात निसर्ग हाच माणसाचा खरा शिक्षक असतो. निसर्गात असलेल्या प्राणी, पक्ष्यांकडून आपल्याला खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात, मात्र आपण कधीही तेवढं बारीक निरीक्षण करत नाहीत. चाणक्य पुढे असंही म्हणतात की जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही गरुडाकडून काही गोष्टी या शिकल्याच पाहिजेत, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

सामर्थ्य – गरूड हा प्रचंड शक्तीसाठी पक्षी असतो. म्हणूनच त्याला पक्षांचा राजा असं देखील म्हटलं जातं. गरुडाकडे उंच भरारी घेण्याचं सामर्थ्य असतं, आपली शिकार कितीही मोठी असली तरी गरूड तिला घाबरत नाही, हे केवळ त्यांच्या अंगात असलेल्या सामार्थ्यामुळे शक्य होतं , त्याला आपल्या ताकदीवर पूर्ण विश्वास असतो. चाणक्य म्हणतात हा गरुडाचा गुण तुम्ही घेतलाच पाहिजे.

आत्मविश्वास – चाणक्य म्हणतात गरुडाकडे प्रचंड आत्मविश्वास असतो. याच आत्मविश्वासाच्या जोरावर तो आकाशात उंच भरारी घेतो. आपण खाली कधीच पडणार नाही, हा आत्मविश्वास असल्यामुळेच गुरुड हवेत जेवढा उंच उडतो, तेवढा इतर कोणताही पक्षी उडू शकत नाही, म्हणूनच गरूड सगळ्या पक्षात वेगळा ठरतो. गरुडाकडे असलेला हाच आत्मविश्वास तुमच्यात देखील असायला हवा. तर तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकतात, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

त्याग, धैर्य – चाणक्य म्हणतात गरूड जसा जसा म्हातारा होतो, तशी तशी त्याची चोच बोथट होते. त्याला शिकार देखील त्यामुळे करता येत नाही. त्याची उपासमार होते, अशावेळी गरूड आपली चोच दगडावर आपटून आपटून अधिक धारदार बनतो, त्यावेळी त्याला प्रचंड वेदना होतात, मात्र तो त्रास सहन करण्याची त्याची तयारी असते, त्यामुळेच तो महान बनतो. गरुडाप्रमाणेच संघर्ष करण्याचा गुण तुमच्याकडेही असायला हवा, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन