
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, हा ग्रंथ आजही अनेकांना आपलं जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो. आर्य चाणक्य यांनी या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचा सांबंध जीवन जगत असताना कुठेनकुठे तरी येतोच. पत्नी कशी असावी? पतीची कर्तव्य काय आहेत? आयुष्यात कोणत्या चुका करू नयेत? काय करावं? आपला खरा मित्र आणि शत्रू कसा ओळखावा? कोणासोबत राहावं? कोणासोबत राहू नये? राजाची कर्तव्य काय आहेत? अशा एकना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत.
दरम्यान चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये पती -पत्नीच्या आयुष्याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पत्नीला आपल्या पतीकडून काय अपेक्षा असतात? पतीला कोणत्या अपेक्षा असतात? पती-पत्नीचं नातं कसं असावं अशा अनेक गोष्टी आर्य चाणक्य यांनी सांगितल्या आहेत. आर्य चाणक्य यांनी अशा देखील काही गोष्टी सांगितल्या आहेत, ते म्हणतात या गोष्टी चुकूनही तुम्ही तुमच्या पत्नीला सांगू नका, जाणून घेऊयात आर्य चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ते?
तुमची कमजोरी पत्नीला सांगू नका – आर्य चाणक्य म्हणतात की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल किंवा ती तुमची कमकुवत बाजू असेल तर त्याबाबत तुमच्या पत्नीशी चुकूनही चर्चा करू नका.
जुन्या प्रेमसंबंधांबाबत चर्चा करू नका – आर्य चाणक्य म्हणतात की तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही पत्नीशी प्रामाणिक असलं पाहिजे, मात्र जर भुतकाळामध्ये तुमचे कोणासोबत प्रेमसंबंध असतील तर त्याची माहिती तुमच्या पत्नीला देऊ नका.
जर तुम्ही काही एखादी गुप्त योजना किंवा रनणिती बनवत असाल तर त्याबद्दल देखील आपल्या पत्नीला माहिती देऊ नका अस चाणक्य यांनी म्हटलं आहे.
तसेच तुमच्या एखाद्या मित्राने मोठ्या विश्वासानं तुम्हाला त्याचं एखादं गुपीत सांगितलं असेल तर त्याबाबत देखील तुमच्या पत्नीसोबत चर्चा करू नका असं आर्य चाणक्य यांनी म्हटलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)