चाणक्य सांगतात, कितीही बलवान असलेल्या शत्रूला तुम्ही हरवू शकता, ‘ही’ रहस्य घ्या जाणून
आचार्य चाणक्या यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये अनेक अशा गोष्टी लिहून ठेवल्या आहेत, ज्या आज आपल्यासाठी फायदेशीर ठरत आहे. शत्रूवर मात कशी करायची यावर देखील चाणक्य यांनी मोठा सल्ला दिला आहे...

आयुष्याच्या अनेक टप्प्यांवर आपल्याला विरोधक किंवा शत्रूंचा सामना करावा लागतो. यामध्ये अनेक खचल्यासारखं होतं. एवढंच नाही तर, आपण माघार घेण्याचा देखील निर्णय घेतो. अनेकदा अशा व्यक्तींसोबत वाद देखील होतात. यावर आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ‘नितीश शास्त्र’ या ग्रंथात बुद्धिमत्ता आणि अचूक रणनीती वापरून संकटकालीन परिस्थितीवर कशी मात करावी, हे स्पष्ट केलं आहे. चाणक्या यांच्या मते, सर्व युद्ध केवळ शारीरिक बळाने जिंकली जात नाहीत. योग्य वेळ, शांत मनाने केलेलं नियोजन मोठं विजय मिळवून देतं. तर जाणून घ्या शत्रूंचा सामना करण्यासाठी काय केलं पाहिजे.
चाणक्य म्हणतात की, रागाच्या किंवा भावनेच्या भरात कधीही घाईने निर्णय घेऊ नका. भावनेच्या प्रभावाखाली घेतलेल्या निर्णयामुळे अनेकदा मोठं नुकसान होतं. सभोवतालच्या परिस्थितीचे काळजीपूर्वक निरीक्षण करून योग्य वेळीच प्रतिक्रिया देणे अधिक प्रभावी ठरतं.
चाणक्य नीतीनुसार, प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमकुवतपणा असतो. शत्रूच्या सामर्थ्याला घाबरण्याऐवजी, त्यांच्या कमकुवतपणा ओळखा. त्यानुसार नियोजन केल्यास, मोठ्या संघर्षांना सामोरे न जाता तुम्ही विजय मिळवू शकता.
कोणत्याही बाबतीत यश मिळवण्यासाठी, आपली पुढची चाल काय आहे हे आपण इतरांना कळू देऊ नये. आपल्या योजना सर्वांना सांगू नका. यशाची खरी रणनीती म्हणजे गुप्तता राखणं, जेणेकरून शत्रूला तुमच्या पुढच्या चालीबद्दल कोणताही सुगावा लागणार नाही.
रागाच्या भरात बोललेले शब्द आणि घेतलेले निर्णय अनेकदा नाती तोडतात. प्रत्येक गोष्टीत शहाणपण आणि तर्काला प्राधान्य दिले पाहिजे. शांत मनाने विचार केल्यास, कोणत्याही मोठ्या समस्येवर सोपा उपाय शोधता येतो.
चाणक्य लोकांना अचूकपणे ओळखण्याला खूप महत्त्व देतात. दिसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. बाहेरून मैत्रीपूर्ण असल्याचा आव आणणारे अनेक लोक आतून तुम्हाला इजा पोहोचवू शकतात. त्यामुळे, कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून दूर राहायचे, हे तुमच्या मनात स्पष्ट असले पाहिजे.
शत्रूशी थेट युद्ध न करताच त्याला निष्प्रभ करणे, हाच सर्वात मोठा विजय आहे. ज्ञान, आत्मविश्वास, क्षमता आणि संयम यांच्या जोरावर स्वतःला अधिक सामर्थ्यवान बनवा. चाणक्य नीती आपल्याला स्पष्टपणे शिकवते की, जेव्हा तुम्ही इतके सामर्थ्यवान बनता, तेव्हा तुमचे विरोधकसुद्धा तुमचा आदर करू लागतील.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)