Chandra Grahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी महिलांनी ‘या’ गोष्टी करू नये अन्यथा, जाणून घ्या महत्त्वाचे नियम….

Chandra Grahan 2025: यंदाच्या वर्षी 2025मध्ये पहिले चंद्रग्रहण मार्च महिन्यात होणार आहे. चंद्रग्रहणाच्या बरोबर 9 तास आधी सुतक काळ सुरू होतो. ग्रहण संपल्यानंतर सुतक काळ संपतो. सुतक काळात महिलांनी काय करावे आणि काय करू नये. चला जाणून घेऊया चंद्रग्रहणाच्या काळामध्ये काय करू नये.

Chandra Grahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी महिलांनी या गोष्टी करू नये अन्यथा, जाणून घ्या महत्त्वाचे नियम....
Chandra Grahan 2025
Image Credit source: TV9 HINDI
| Edited By: | Updated on: Mar 07, 2025 | 1:49 AM

हिंदू धर्मामध्ये कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी चांगली वेळ पाहिली जाते. मान्यतेनुसार, ग्रहणाच्या वेळ कोणत्याही प्रकारची चांगले कामं करू नये. ग्रंथानुसार, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे दोन्ही ग्रहण अशुभ मानले जाते. यांदाच्या वर्षामध्ये म्हणजेच 2025मध्ये मार्च महिन्यात चंद्रग्रहण असणार आहे. चंद्रग्रहणाच्या वेळी महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे येऊ शकतात. ग्रहणाच्या काळामध्ये महत्त्वाच्या कामामध्ये अजथळे येतात आणि तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होत नाही. ग्रहणाच्या काळामध्ये तुमच्या घरामध्ये नकारात्मक उर्जा असते. चंद्रग्रहणाच्या काळामध्ये चांगले काम केल्यामुळे तुम्हाला त्याचे फळ मिळत नाही. धार्मिक श्रद्धेनुसार, ग्रहणाच्या काळाला सुतक काळ देखील म्हणतात. ग्रहणाचा काळ अशुभ मानला जातो.

चंद्रग्रहणाच्या बरोबर 9 तास आधी त्याचा सुतक काळ सुरू होतो. ग्रहण संपल्यानंतर सुतक काळ संपतो. ग्रहणाच्या सुतक काळात महिलांनी काय करावे आणि काय करू नये. ग्रहणाच्या काळामध्ये काही विशेष नियम सांगितलले आहे. चंद्रग्रहणाचा त्यांच्यावर कोणताही वाईट परिणाम होऊ नये म्हणून महिलांनी हे नियम पाळले पाहिजेत. या नियमांचे तुम्ही पालन केल्यास तुमच्या आयुष्यावर त्याचा नकारात्मक परिणाम होणार नाही.

ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्रग्रहण पौर्णिमेच्या दिवशी होते. यावेळी पौर्णिमा १४ मार्च रोजी आहे. या दिवशी चंद्रग्रहण होईल. 14 मार्च रोजी सकाळी 9:29 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल. त्याच वेळी, ते दुपारी 3:29 वाजता संपेल. तथापि, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. अशा परिस्थितीत, चंद्रग्रहणाचा सुतक काळ देखील भारतात वैध राहणार नाही. या दिवशी होळीचा सणही साजरा केला जाईल.

सुतक काळात महिलांनी या गोष्टी करू नये…..

चंद्रग्रहणाच्या सुतक काळात महिलांनी अन्न शिजवू नये.

सुतक काळात महिलांनी केस कापू नयेत आणि केसांना तेल लावू नये.

महिलांनी या काळात चुकूनही झोपू नये.

सुतकच्या काळात महिलांनी मेकअप करू नये.

चाकूसारख्या धारदार वस्तूंनी काम करू नका.

सुतक काळात महिलांनी शिवणकाम किंवा भरतकाम करू नये.

सुतक काळामध्ये अन्न सेवन करू नका.

सुतक काळात महिलांनी या गोष्टी करा….

सुतक काळात गर्भवती महिलांनी घरीच राहावे.

घराच्या खिडक्यांवर जाड पडदे लावा, जेणेकरून ग्रहणाचे नकारात्मक किरण घरात प्रवेश करू नयेत.

ग्रहण संपल्यानंतर, गंगाजल पाण्यात मिसळून स्नान करा.

भगवान शिव आणि भगवान विष्णू यांचे ध्यान करा.

तुमच्या आवडत्या देवतेचे ध्यान करा.

गर्भवती महिलांनी त्यांच्या अन्न आणि पेयांमध्ये तुळशीची पाने घालावीत.