Chaturmas 2023 : यंदा चार नाही तर पाच महिन्यांचा असेल चातुर्मास, या तारखेला असेल देवशयनी आणि देवउठी एकादशी

चातुर्मासाच्या 4 महिन्यांत जास्तीत जास्त वेळ देवाची आराधना आणि भक्ती करण्यात जातो. विविध नियम पाळले जातात. ऋषी-मुनी चातुर्मासात प्रवास करत नाहीत तर एकाच ठिकाणी थांबून भगवंताच्या भक्तीत तल्लीन राहतात.

Chaturmas 2023 : यंदा चार नाही तर पाच महिन्यांचा असेल चातुर्मास, या तारखेला असेल देवशयनी आणि देवउठी एकादशी
भगवान विष्णूImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 10:50 AM

मुंबई : सनातन धर्मात चातुर्मास (Chaturmas 2023) अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. चातुर्मासाच्या 4 महिन्यांत जास्तीत जास्त वेळ देवाची आराधना आणि भक्ती करण्यात जातो. विविध नियम पाळले जातात. ऋषी-मुनी चातुर्मासात प्रवास करत नाहीत तर एकाच ठिकाणी थांबून भगवंताच्या भक्तीत तल्लीन राहतात. भगवान विष्णू ज्या वेळेला योगनिद्रामध्ये मग्न असतात त्याला चातुर्मास म्हणतात. देवशयनी एकादशी आणि देवउठी एकादशी दरम्यानचा काळ म्हणजे चातुर्मास असतो.

देवशयनी आणि देवउठी एकादशीची तारीख

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री हरी विश्रांतीसाठी जातात. यावर्षी देवशयनी एकादशी 29 जून 2023 रोजी येत आहे. दुसरीकडे, देवउठी एकादशीला कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. यासोबतच 4 महिन्यांपासून थांबलेली शुभ कार्ये सुरू होतात. 2023 मध्ये देवउठी एकादशी 23 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. श्रावण महिन्यात अधिक मास असल्याने या वर्षी श्रावण महिना 2 महिन्यांचा तर चातुर्मास 5 महिन्यांचा असेल. म्हणजेच शुभ कार्य करण्यासाठी 1 महिन्यापेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागते.

हे सुद्धा वाचा

चातुर्मासात या गोष्टी अवश्य पाळा

  1. चातुर्मासात लग्न, मुंज, मुंडण, वास्तू, नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी कोणतेही शुभ कार्य करू नये. चातुर्मासाचा काळ केवळ उपासनेसाठी योग्य आहे.
  2.  चातुर्मासात मांसाहार, दारू, मुळा, वांगी, लसूण-कांदा यांचे सेवन करू नये.
  3. चातुर्मासात एकांतात राहून ब्रह्मचर्य पाळावे.
  4. असे मानले जाते की, जो व्यक्ती चातुर्मासात गायींची काळजी घेतो आणि अन्नपदार्थ दान करतो. त्याच्यावर देवी-देवतांची विशेष कृपा सदैव राहते. या 4 महिन्यांत अन्न आणि गाईचे दान करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. असे मानले जाते की या उपायाने अडकलेले पैसे परत मिळतात आणि कर्जाची समस्याही दूर होते.
  5. या चार महिन्यात सूर्यदेव, भगवान विष्णू, भगवान शिव, भगवान गणेश आणि देवी पार्वतीच्या उपासनेचे विशेष महत्त्व मानले जाते.
  6. चातुर्मासात हरभरा आणि गुळाचे दान केल्यास नोकरी आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच यावेळी मंदिरात कापूर दान करणे देखील शुभ मानले जाते. यामुळे कुटुंबात सुख-शांती राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.