AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chaturmas 2023 : या तारखेपासून सुरू होणार चातुर्मास, यंदाचा चातुर्मास आहे दरवर्षीपेक्षा विशेष

श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या चार महिन्यांत भगवान विष्णू निद्रा घेतात. या दरम्यान शुभ कार्यावर पूर्ण बंदी असते. यंदा देवशयनी एकादशी 29 जून रोजी आहे.

Chaturmas 2023 : या तारखेपासून सुरू होणार चातुर्मास, यंदाचा चातुर्मास आहे दरवर्षीपेक्षा विशेष
चातुर्मासImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jun 04, 2023 | 10:06 AM
Share

मुंबई : आषाढ शुक्ल पक्षाच्या एकादशीपासून म्हणजे देवशयनी एकादशीपासून चातुर्मास (Chaturma 2023) सुरू होतो, जो चार महिने चालतो.  श्रावण, भाद्रपद, अश्विन आणि कार्तिक या चार महिन्यांत भगवान विष्णू निद्रा घेतात. या दरम्यान शुभ कार्यावर पूर्ण बंदी असते. यंदा देवशयनी एकादशी 29 जून रोजी आहे. या दिवसापासून भगवान विष्णू संपूर्ण 5 महिने योग निद्रामध्ये जातील आणि 23 नोव्हेंबर 2023 रोजी देवऊठी एकादशीच्या दिवशी जागे होतील. यानंतर तुळशी विवाह होईल आणि त्यानंतर शुभ कार्याला सुरुवात होईल.

यावेळी 5 महिन्यांचा चातुर्मास

2023 मध्ये चातुर्मास 4 महिन्यांऐवजी 5 महिन्यांचा असेल, कारण श्रावण महिन्यात अधीक महिना असेल. अशा प्रकारे श्रावण महिना 2 महिन्यांचा असेल आणि श्रावण सोमवार देखील 8 असेल. यामुळे लोकांना लग्न, मुंडन, घरकाम, नवीन व्यावसाय सुरू करण्यासाठी 4 महिन्यांऐवजी 5 महिने वाट पाहावी लागणार आहे. यासोबतच भोलेनाथाची पूजा आणि आशीर्वाद घेण्यासाठी लोकांना सावनचे 59 दिवस मिळणार आहेत.

अनेक प्रमुख व्रतवैकल्ये चातुर्मासात येतात

हिंदू धर्माव्यतिरिक्त जैन धर्माच्या लोकांसाठीही चातुर्मास खूप महत्त्वाचा आहे. या दरम्यान जैन संत एकाच ठिकाणी राहून देवाची भक्ती करतात. यासोबतच चातुर्मासातील पवित्र सावन महिन्याव्यतिरिक्त रक्षाबंधन, नागपंचमी, गणेशोत्सव, पितृ पक्ष, नवरात्री, दसरा असे अनेक मोठे सण साजरे केले जातात.

चातुर्मासात या गोष्टी लक्षात ठेवा

  1.  चातुर्मासात जास्तीत जास्त वेळ देवाच्या भक्तीमध्ये घालवावा.
  2.  चातुर्मासात लसूण, कांदा, मांसाहार, मद्य यांसारख्या तामसी गोष्टींचे सेवन करू नये.
  3. धार्मिक शास्त्रानुसार चातुर्मासात ब्रह्मचर्य पाळावे आणि जमिनीवर झोपावे.
  4. चातुर्मासात दही, मध, मुळा, वांगी आणि पालेभाज्या खाऊ नये, त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?