कोर्ट-कचेरीची झंझट दूर करण्यासाठी ‘हे’ व्रत ठेवा, कायमची कटकट दूर होईल
काही दिवसांनी विजया एकादशी येत आहे. या दिवशी काही उपाय केल्यास जीवनात सुख-शांती तर येतेच पण वाद-विवादातही विजय प्राप्त होतो. यासाठी तुमच्या घरात देखील कोर्ट कचेरीच्या समस्या असतील व त्या मार्गी लावाव्या असे वाटतं असल्यास तुम्ही हे उपाय करा.

भारतीय दिनदर्शिकेनुसार एका वर्षात २४ एकादशी येतात. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशींचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते. वैदिक काळापासून एकादशी तिथीचे व्रत करण्याची परंपरा आहे. एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे, ज्यांचे उपवास आणि नियम आणि नियमांचे पालन केल्याने तुम्हाला आयुष्यात चमत्कारिक फायदे होतात. अशामध्ये काही एकादशीचे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात, तर काही एकादशीचे व्रत केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि आनंद येतो. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला विजया एकादशी येते. या एकादशीचे स्वतःचे विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते.
या विजया एकादशीचे व्रत केल्याने तुम्हाला अनेक संकंटांपासून मुक्ती मिळते. तस्वेच कोणते काम अडकले असेल त्यातून मार्ग निघतो. तुमचे सुद्धा इतर काही कामात अडथळे येत असतील तर तुम्ही विजया एकादशीचे व्रत करा. यासाठी उपाय काय करावे व व्रत कसे करावे हे जाणून घेऊयात.
विजया एकादशीला करावयाचे उपाय
एकादशीला केलेले उपाय तुम्हाला सर्व कार्यात यश मिळवण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. वर्षभरात २४ एकादशी असतात. या सर्व एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित असतात. यातच विजया एकादशीचे व्रत केल्याने तुम्हाला सर्व कार्यात विजय प्राप्त होतो म्हणजेच कोणत्याही वादात, प्रकरणामध्ये किंवा इतर कोणत्याही कामात अडथळा येत असेल तर विजया एकादशीचे व्रत केल्यास त्या सर्व कार्यात यश प्राप्त होते. 2025 मध्ये विजया एकादशीचे व्रत सोमवार, 24 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.
व्रत कसे करावे
एकादशीचे व्रत करण्यासाठी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून भगवान विष्णूच्या मंत्रांचा उच्चार, स्तोत्रांचे पठण आणि विष्णुसहस्त्रनाम पठण करून व्रत करण्याचा संकल्प करा. एकादशीच्या व्रतामध्ये तांदूळ किंवा तांदळापासून बनवलेले कोणतेही खाद्यपदार्थ पूर्णपणे खाणे टाळावे. असे मानले जाते की त्याचे सेवन केल्यास व्यक्तीला दोष लागतो. सर्व एकादशींमध्ये विजया एकादशीचे स्वतःचे महत्त्व आहे ज्यामुळे सर्व प्रलंबित कामांना यश मिळते, वाद, खटले इत्यादी संपतात.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)