तुमच्या स्वप्नात मृत नातेवाईक येतात? काय आहे संकेत? प्रेमानंद महाराजांनी सांगितला अर्थ
अनेकदा आपल्या स्वप्नामध्ये मृत नातेवाईक येतात, अशा स्वप्नाचा नेमका काय अर्थ असतो? असं स्वप्न काय संकेत देतं? याबाबत प्रेमानंद महाराज यांनी मार्गदर्शन केलं आहे.

प्रेमानंद महाराज यांचे जगभरात करोडो फॉलोअर्स आहेत. ज्यामध्ये अनेक दिग्गज लोकांचा समावेश आहे. स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा देखील प्रेमानंद महाराज यांचे भक्त आहेत. अनेक भक्त दररोज आपल्या विविध समस्या घेऊन प्रेमानंद महाराज यांच्याकडे येत असतात, महाराज आपल्या भक्तांना त्या समस्यांवरील उपाय सांगतात, असाच एक भक्त प्रेमानंद महाराज यांच्याकडे आपली समस्या घेऊन आला, त्याने महाराजांना प्रश्न विचारला महाराज जर स्वप्नात मृत नातेवाईक आले तर त्या स्वप्नाचा अर्थ काय होतो? काय संकेत मिळतात.
भक्ताच्या या प्रश्नावर प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं की, स्वप्न तीन प्रकारचे असतात, पहिल्या प्रकारामध्ये तुमच्या स्वप्नात मृत नातेवाईक येतात, दुसऱ्या प्रकारामध्ये तुमच्या स्वप्नामध्ये देव आणि साधू-संत येतात तर तिसऱ्या प्रकारचं जे स्वप्न असतं त्याचा कोणताच अर्थ निघत नाही.
प्रेमानंद महाराज यांनी पुढे म्हटलं की, सामान्यपणे व्यक्तीचं मन अनेक व्यक्तींसोबत, गोष्टींसोबत जोडलं गेलेलं असतं. अनेकदा असं होत की व्यक्तीचं मन ज्या लोकांसोबत जोडलं गेलेलं आहे, ते व्यक्ती जिंवत असतील किंवा मृत त्याच्या स्वप्नात येतात. जर मृत व्यक्ती तुमच्या स्वप्नात आले तर काळजी करण्याचं कारण नाही, याचा अर्थ हा बिलकूल होत नाही की तुम्ही काही तरी चुकीचं केलं आहे, वाईट केलं आहे, असं काहीच नसतं, त्यामुळे भीतीचं काहीही कारण नाही, असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
स्वप्नात मृत व्यक्ती आल्यास काय करावं?
प्रेमानंद महाराज म्हणतात जर तुमच्या स्वप्नात अशी व्यक्ती येत असेल तर दान-पुण्याची सवय लावा. दररोज दान करणं अधिक लाभदायी असतं. तुम्ही अन्न आणि पाण्याचं दान करा, जर तुम्ही अन्न आणि पाणी दान केलं तर ते तुमच्या पूर्वजापर्यंत पोहोचतं. जर तुम्ही दान केलं तर तुमच्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो.
याच कारणामुळे पिंडदान देखील केलं जातं. जोपर्यंत तुमच्या घरामध्ये वडीलधारे माणसं जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांची सेवा केली पाहिजे, आणि त्यांच्या मृत्यूनंतर दान-पुण्य करावं असं प्रेमानंद महाराज यांनी म्हटलं आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
