देवशयनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख आणि या दिवसाचे महत्त्व
देवशयनी एकादशीचे व्रत हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. या एकादशीचे व्रतापासून चातुर्मासाची सुरुवात आहे. 2025 मध्ये देवशयनी एकादशी कोणत्या दिवशी येत आहे ते जाणून घेऊयात.

आपल्या हिंदू धर्मात एकादशी व्रताला खूप महत्त्व आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. 2025 मध्ये येणारी देवशयनी एकादशी कोणत्या तारखेला आहे याबद्दल बहुतेक लोकांमध्ये संभ्रम आहे. तर 6 किंवा 7 जुलै यापैकी कोणत्या दिवशी एकादशी व्रत पाळले जाईल हे आजच्या या लेखात जाणून घेऊयात…
देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णूंचा निद्राकाळ सुरू होतो. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांसाठी योग निद्रामध्ये जातात, म्हणूनच त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. चार महिन्यांच्या देवशयनी एकादशीनंतर, भगवान विष्णू प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी जागे होतात, या दिवसाला देवउठनी एकादशी म्हणतात. इंग्रजी कॅलेंडरनुसार देवशयनी एकादशीचे व्रत 2025 मध्ये जुलै महिन्यात येत आहे.
देवशयनी एकादशी व्रत 2025 तिथी
एकादशी तिथी ही 5 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी सुरू होईल. ते 06 जुलै रोजी रात्री 9 वाजून 14 मिनिटांनी संपेल.
उदयतिथी असल्यामुळे 6 जुलै 2025 रोजी एकादशीचे व्रत केले जाणार आहे.
देवशयनी एकादशीचे महत्त्व
आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्येवर योगनिद्रात जातात आणि कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीपर्यंत म्हणजेच प्रबोधिनी एकादशीपर्यंत विश्रांती घेतात. या काळात भगवान शिव हे या संपुर्ण जगाची काळजी घेतात. म्हणून या चार महिन्यांला चातुर्मास म्हणतात. या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच भगवान शिवाचीही पूजा केली जाते. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप, कथा सांगणे आणि ब्राह्मणांना जेवण देणे याने विशेष फळ मिळते.
धार्मिक मान्यतेनुसार देवशयनी एकादशीला व्रत ठेवून भगवान विष्णूची पूजा केल्याने पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो. तसेच देवशयनी एकादशीच्या दिवशी काही वस्तूंचे दान करणे शुभ मानले जाते. या दिवशी अन्न, पाणी, फळे, कपडे आणि शंख दान करावेत. याशिवाय पिवळे कपडे, चंदन आणि केशर दान करणे देखील शुभ मानले जाते. गरिबांना अन्न देणे आणि गोशाळेतील गायींची सेवा करणे हे देखील पुण्यकर्म मानले जाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
