Vivah Muhurat 2021 : देवउठणी एकादशीपासून शुभ कार्यांना सुरुवात, जाणून घ्या लग्नासाठी शेवटच्या दोन महिन्यात किती मुहूर्त

दिवाळीनंतर लग्नाचा हंगाम सुरु होतो. ज्यांना हिवाळ्यात लग्न करायचे आहे, ते नोव्हेंबरनंतरच्या तारखांची म्हणजे दिवाळीनंतरच्या मुहूर्ताची वाट बघू लागतात. यामुळेच दिवाळीच्या नंतरचा शुभ मुहूर्त पाहून लोक लग्नाच्या तयारीला लागतात. अशा स्थितीत प्रत्येक वेळेप्रमाणे यंदाही विवाहांची शुभ मुहूर्तमेढ आली आहे. यावेळी लग्नासाठी फारच कमी मुहूर्त आहेत.

Vivah Muhurat 2021 : देवउठणी एकादशीपासून शुभ कार्यांना सुरुवात, जाणून घ्या लग्नासाठी शेवटच्या दोन महिन्यात किती मुहूर्त
मॅट्रिमोनी साईट्सवर तब्बल 41 महिलांची फसवणूक करणाऱ्या लखोबा लोखंडेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 1:09 PM

मुंबई : Vivah Muhurat 2021 : दिवाळीनंतर लग्नाचा हंगाम सुरु होतो. ज्यांना हिवाळ्यात लग्न करायचे आहे, ते नोव्हेंबरनंतरच्या तारखांची म्हणजे दिवाळीनंतरच्या मुहूर्ताची वाट बघू लागतात. यामुळेच दिवाळीच्या नंतरचा शुभ मुहूर्त पाहून लोक लग्नाच्या तयारीला लागतात. अशा स्थितीत प्रत्येक वेळेप्रमाणे यंदाही विवाहांची शुभ मुहूर्तमेढ आली आहे. यावेळी लग्नासाठी फारच कमी मुहूर्त आहेत.

आज आम्ही तुम्हा सर्वांना या हंगामातील विवाहसोहळ्याच्या शुभ मुहूर्ताची माहिती देणार आहोत. यंदा फक्त 19 नोव्हेंबर ते 13 डिसेंबरपर्यंत लग्नासाठी शुभ मुहूर्त आहेत. म्हणजेच लग्नासाठी केवळ 15 मुहूर्त आहेत, ज्यामध्ये विवाह होऊ शकतात. हिंदूंमध्ये देवउठनी एकादशीपासून (Devuthani Ekadashi) विवाहांना सुरुवात होते.

यावर्षी 15 नोव्हेंबरला देवउठनी एकादशीपासून शुभ कार्याला सुरुवात होणार आहे. मात्र, यावेळी लग्नाचे मुहूर्त कमी असल्याने बहुतांश ठिकाणी लग्नसराई, हॉटेल आदींसाठी लोकांना अडचणी येत आहेत.

लग्नाचे मुहूर्त किती दिवस

या हंगामात देवउठनी एकादशीनंतर 15 नोव्हेंबरला आणि शेवटचा मुहूर्त 13 डिसेंबरला आहे. त्यानुसार या पुढील 2 महिन्यांत केवळ 15 शुभ मुहूर्त आहेत. तर पुढील वर्षी 15 जानेवारी 2022 पासून पुन्हा शुभ मुहूर्त सुरू होतील.

विवाहाचे शुभ मुहूर्त –

2021 मध्ये नोव्हेंबर महिन्यात 19, 20, 21, 26, 28, 29 आणि 30 केवळ 7 तारखाच लग्नासाठी शुभ असणार आहेत. याशिवाय डिसेंबर महिन्यात 8 शुभ मुहूर्त असून ते 1, 2, 5, 6, 7, 11, 12 आणि 13 तारखेला आहेत.

कोरोनामुळे सर्वांचेच मोठे नुकसान होत आहे. ज्या व्यापाऱ्यांचा व्यवसाय हंगामी आहे, त्यांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. पण, यंदा लगीनसराईच्या मोसमापासून लग्नमंडप, हॉटेल्स ते बँड, ढोल, कॅटरर्स, मिठाईवाले आदींकडून या लोकांना काही फायदा होईल, अशी आशा आहे. कमी मुहूर्तामुळे आता लग्नमंडपाचे बुकिंग न झाल्याने अडचणी येत आहेत. याशिवाय बँड-बाज, ढोल, घोडी, बग्गी अशीच अवस्था आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Gangajal | जर तुम्हीही घरात गंगाजल ठेवत असाल तर या चुका करणे टाळा, अन्यथा समस्यांना आमंत्रण द्याल

Narak Chaturdashi 2021 : नरक चतुर्दशीच्या दिवशी हे उपाय करा, हनुमानजी सर्व संकटं दूर करतील

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.