AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वप्नात अंत्ययात्रा दिसली? घाबरू नका, ठरू शकतो शुभ संकेत! जाणून घ्या ‘या’ स्वप्नामागचा अर्थ

स्वप्न शास्त्रानुसार, झोपेत असताना आपण जी स्वप्ने पाहतो, ती आपल्याला भविष्याबद्दल अनेक प्रकारची संकेत देणारी असतात. स्वप्नांमध्ये बर्‍याच वेळा आपण अशा काही गोष्टी पाहतो, ज्यामुळे आपले मन खूप विचलित होते. तर, अशीही काही स्वप्ने असतात जी, आपल्याला आंतरिक आनंद किंवा पूर्ती देतात.

स्वप्नात अंत्ययात्रा दिसली? घाबरू नका, ठरू शकतो शुभ संकेत! जाणून घ्या ‘या’ स्वप्नामागचा अर्थ
स्वप्नात अंत्ययात्रा दिसली?
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 5:36 PM
Share

मुंबई : स्वप्न शास्त्रानुसार, झोपेत असताना आपण जी स्वप्ने पाहतो, ती आपल्याला भविष्याबद्दल अनेक प्रकारची संकेत देणारी असतात. स्वप्नांमध्ये बर्‍याच वेळा आपण अशा काही गोष्टी पाहतो, ज्यामुळे आपले मन खूप विचलित होते. तर, अशीही काही स्वप्ने असतात जी, आपल्याला आंतरिक आनंद किंवा पूर्ती देतात. सहसा आम्हाला फक्त तीच स्वप्ने आठवतात, जी अत्यंत भयानक किंवा अतिशय आनंददायक असतात (Did you see the funeral in a dream Dont be afraid it can be a good sign know the meaning).

याशिवाय आपल्या आयुष्याशी संबंधित स्वप्न काही काळ आपल्या मनात आणि आयुष्यात घर करून टिकून राहतात. मात्र, सत्य हे आहे की आपल्याला पडलेली बहुतेक स्वप्ने पाहिल्यानंतर लगेच विसरली जातात. तथापि, ही स्वप्ने आपल्या भविष्याबद्दल काय सूचित करतात?  सुप्रसिद्ध ज्योतिषी राजेश शुक्ला यांनी टीव्ही 9शी खास चर्चेत अशा स्वप्नांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली.

स्वप्नात अंत्ययात्रा दिसणे शुभ!

या संदर्भात बोलताना ज्योतिषी राजेश शुक्ला यांनी स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींच्या अर्थाविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. अनेकांना झोपेच्या वेळी स्वप्नात एखादी अंत्ययात्रा दिसते, अशी स्वप्न बघून लोक खूप घाबरतात. काही लोक स्वप्नात अंत्ययात्रा दिसणे अशुभ मानतात. मात्र, स्वप्न शास्त्रात स्वप्नात दिसणारी अंत्ययात्रा अतिशय शुभ मानली जाते.

राजेश शुक्ला म्हणतात की, स्वप्नात अंत्ययात्रा दिसणे अनेक मार्गांनी अतिशय शुभ फलदायी आहे. जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात अंत्ययात्रा दिसली, तर तो त्याच्यासाठी चांगला संकेत आहे. जर, एखाद्या आजारी व्यक्तीला स्वप्नात अंत्ययात्रा दिसली, तर ते स्वप्न असे सूचित करते की, ती व्यक्ती लवकरच रोगांपासून मुक्त होईल. याशिवाय अशी स्वप्ने काही इतर शुभ संकेत देखील देतात.

स्वप्नात अंत्ययात्रा दिसणाऱ्या व्यापाऱ्याला होतो नफा

इतकेच नाही तर जर एखाद्या व्यवसायिकाला झोपेत असताना त्याच्या स्वप्नातील एखादी अंत्ययात्रा दिसली तर, तो त्या व्यावसायिकास सूचित करतो की, लवकरच त्याला आपल्या व्यवसायात भरपूर नफा होणार आहे. मग हा धनलाभ कोणत्याही प्रकारे होऊ शकतो. एकंदरीत असे म्हणता येईल की, स्वप्नात अंत्ययात्रा पाहणे प्रत्येक प्रकारे शुभ आहे. जर, आपल्याला आपल्या स्वप्नात कधीही अंत्ययात्रा दिसली, तर घाबरून जाण्याची किंवा भीती वाटण्याची गरज नाही. त्याऐवजी हे स्वप्न तुमच्यासाठी खूप शुभ आहे आणि लवकरच तुमच्या बर्‍याच अडचणी दूर होणार असल्याचे सूचित करते.

(टीप : उपरोक्त लेख ज्योतिषी राजेश शुक्ला यांच्या माहितीवर आधारित आहे. यातून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा उद्देश नाही.)

(Did you see the funeral in a dream Dont be afraid it can be a good sign know the meaning)

हेही वाचा :

Garuda Purana | हमखास यशस्वी होण्याचे पाच मार्ग; ‘या’ गोष्टी केल्यात तर कधीच अपयश येणार नाही

Chanakya Niti | घर बांधण्यासाठी आदर्श जागा कोणत्या, जाणून घ्या सर्वकाही

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.