Dip Amavasya 2023 : उद्या दीप अमावस्येला अवश्य करा हे चार उपाय, दूर होतील सर्व संकटे
उद्या जिवता आणि दिप अमावस्या आहे. जरा आणि जिवंतीका यांच्या पूजनासोबतच महादेवाच्या उपासनेला देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या काही उपायंनी जीवनातील संकटे दूर होतात.

मुंबई : हिंदू धर्मात अमावस्येला विशेष महत्त्व आहे. अमावस्येच्या रात्री चंद्र पूर्णपणे लपलेला असतो. श्रावणाच्या आदल्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला दीप अमावस्या (Dip Amavasya 2023) म्हणतात. तसेच ही अमावस्या सोमवारी येत असल्याने तीला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते. या अमावस्येला दीप पूजन आणि जिवतीची पूजा केली जाते. यंदा सोमवती अमावस्या 17 जुलैला आहे. धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी भगवान शंकराची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याच्यावर महादेवाची कृपादृष्टी कायम राहते. असेही मानले जाते की सोमवती अमावस्येच्या दिवशी उपवास केल्याने विवाहित महिलांना भगवान शंकराच्या कृपेने अखंड सौभाग्य प्राप्त होते. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास संकटे दूर होतात.
1. पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा
सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते. दिवा लावताना त्यात लवंगही टाका. यानंतर पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करावा. यामुळे पितृदोष दूर होतो.
2. भगवान शिवाची पूजा करा
या दिवशी भगवान शिवाची पूजा देखील खूप फलदायी मानली जाते. सोमवती अमावस्येला भगवान शिवाची आराधना करावी. शिवलिंगाला बेलपत्र, दूध, दह्याने अभिषेक करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा.
3. कुत्र्याला पोळी खायला द्या
सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला पोळी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने रोग दूर होतात आणि जीवनातील संकटे नाहीसे होतात.
4. माशांना पिठाचे गोळे खायला द्या
या दिवशी नदी किंवा तलावातील माशांना पिठाचे गोळे खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते. असे केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख समृद्धी नांदते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
