Diwali 2022: सूर्यग्रहणामुळे यंदा अशी साजरी होणार दिवाळी, जाणून घ्या मुहूर्त

यंदा दिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण आल्याने लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्ताबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. जाणून घेऊया नेमका मुहूर्त कधी आहे.

Diwali 2022: सूर्यग्रहणामुळे यंदा अशी साजरी होणार दिवाळी, जाणून घ्या मुहूर्त
Diwali 2022Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 5:36 PM

मुंबई, दिवाळी (Diwali 2022) हा सण दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो, मात्र यावेळी अमावस्येला सूर्यग्रहण (solar eclipse) होणार आहे. ग्रहण काळात कोणताही सण किंवा शुभ कार्य केले जात नाही. अशा परिस्थितीत दीपावलीचा सण कधीपासून साजरा होणार? याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. जाणून घेऊया दिवाळीचा सण नेमका कोणत्या मुहूर्तावर साजरा होणार आहे. तसेच सूर्यग्रहांची वेळ काय असणार आहे.

सूर्यग्रहण केव्हा आहे?

सूर्यग्रहणाची वेळ – 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 04.29 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 05.42 वाजता समाप्त होईल. सुतक काळ ग्रहणाच्या आधी आणि नंतरचा असतो. सूर्यग्रहण भारतासोबतच जगातील अनेक देशांमध्ये दिसणार आहे. त्याचा परिणाम भारतात फारच अंशत: होईल असे जोतिष तज्ज्ञांचे मत आहे.

दिवाळी सोमवार, 24 ऑक्टोबर रोजी साजरी केली आहे, या दिवशी प्रदोष अमावस्या आहे आणि 25 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण होईल. पंचांगाच्या फरकामुळे 25 ऑक्टोबरला अमावस्याही असेल. पण दीपावली ही रात्रीची पूजा आहे आणि 24 ऑक्टोबरला संध्याकाळी अमावस्या सुरू होणार आहे, त्यामुळे 24 ऑक्टोबरलाच दीपावली देशभरात साजरी केली जाईल.

हे सुद्धा वाचा

कधी साजरी होणार दिवाळी

चतुर्दशी तिथी 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:29 पर्यंत राहील, त्यानंतर अमावास्या सुरू होईल, जी दुसऱ्या दिवशी 25 ऑक्टोबरपर्यंत राहील. त्यामुळे  24 ऑक्टोबरला दीपावलीचा सण रात्रभर साजरा करता येईल. दिवाळीची पूजा अमावस्या तिथीच्या रात्रीच केली जाते. ही रात्रीची पूजा आहे आणि ही तारीख 25 ऑक्टोबरच्या रात्री असेल. म्हणजेच 24 ऑक्टोबर रोजी 05:29 पासून दिवाळीचा सण साजरा केला जाऊ शकतो.

लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त

प्रदोष काळ संध्याकाळी 6 ते 8.32, वार्षिक लग्न 7.14 ते 9.11 पर्यंत आणि सिंह लग्न मध्यरात्री 1.42 ते 3.57 पर्यंत करता येते, दुसऱ्या दिवशी ग्रहण मोक्षाच्या आधी सूर्यास्त होतो.  हा भ्रष्ट काळ मानला जाईल. त्याचे सुतक 12 तास आधी 25 तारखेला पहाटे 4.31 वाजता सुरू होईल, जे दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर सुटेल.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.