दिवाळीनिमित्ताने घराला कुलूप लावून जाणार असाल तर एकदा ही बातमी वाचा, पोलीसांनी केल्या विशेष सूचना

दिवाळी सणावेळी शाळांना सुट्टी असते, त्यामुळे अनेक पालक दिवाळीत लक्ष्मीपूजन करून गावी किंवा सहलीला जात असतात.

दिवाळीनिमित्ताने घराला कुलूप लावून जाणार असाल तर एकदा ही बातमी वाचा, पोलीसांनी केल्या विशेष सूचना
संपत्तीसाठी पत्नीनेच दिली पतीच्या हत्येची सुपारीImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 26, 2022 | 12:52 PM

Nashik News : दिवाळी सणाच्या (Diwali Festival) पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीसांनी (Nashik City Police) नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोड्या, चोऱ्या, सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असतांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने नाशिक पोलीसांनी शहरातील नागरिकांना विशेष आवाहन केले आहे. लक्ष्मीपूजनानंतर बहुतांश नागरिक हे आपल्या गावी किंवा सहलीसाठी जात असतात. त्यामुळे गावी जाणाऱ्यांनी आपल्या घरातील मौल्यवान वस्तु आणि वाहने सुरक्षित कसे ठेवता येईल याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये नशिक शहरात चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नाशिक शहर पोलीसांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्ती पथकाची स्थापना करत ठिकठिकाणी गस्त वाढवली जात असून नागरिकांनीही सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे.

दिवाळी सणावेळी शाळांना सुट्टी असते, त्यामुळे अनेक पालक दिवाळीत लक्ष्मीपूजन करून गावी किंवा सहलीला जात असतात.

त्याच दरम्यान चोरटे घराला लावलेले कुलूप पाहून घरफोडी करत लाखों रुपयांचा ऐवज लंपास करत डल्ला मारत असतात.

हे सुद्धा वाचा

दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरीच्या घटना घडत आहे, भरदिवसा चोरटे घरफोडया करत लाखों रुपयांचा ऐवज लंपास करत आहे.

त्यामुळे दिवाळीत बंद असलेली घरे चोरट्यांच्या टार्गेटवर असल्याची शक्यता असते, त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणे महत्वाचे आहे.

नागरिकांनी घर बंद करून गावी जाताना घरात किंवा सहलीला जातांना मौल्यवान वस्तू घरात ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.

मौल्यवान वस्तू बँकेत लॉकरमध्ये ठेवावेत किंवा स्वत:जवळ बाळगावे, वाहनांची सुरक्षितता तपासून घ्यावी अशा सूचना करण्यात आल्या आहे.

याशिवाय सोसायटी किंवा पार्किंग असल्यास सुरक्षारक्षकाला कल्पना देऊन ठेवा, अनोळखी व्यक्तीला प्रवेश न देण्याच्या सूचना कराव्यात.

सजग राहण्यास सांगावे, अनोळखी व्यक्तींना इमारतीमध्ये प्रवेश नाकारावा, शेजारी राहणाऱ्यांना सजग राहण्यास सांगावे असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

Non Stop LIVE Update
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.