रमा एकादशीच्या दिवशी करा ‘हे’ खास उपाय, गरिबी तुमच्या घराला करणार नाही स्पर्श
रमा एकादशीला भगवान विष्णूची पूजा करण्यासोबतच लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले जातात. जर लक्ष्मी देवी प्रसन्न झाली तर त्या व्यक्तीच्या घराला गरिबी स्पर्श करत नाही असे मानले जाते. तर चला रमा एकादशीला कोणते उपाय करावे हे जाणून घेऊयात...

धार्मिक शास्त्रांमध्ये कार्तिक महिना हा विश्वाचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. या महिन्यात भगवान विष्णूची पूजा आणि उपवास केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. रमा एकादशी देखील याच महिन्यात येते. एकादशीचे व्रत महिन्यातून दोनदा असते. एक एकादशी कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला रमा एकादशी म्हणतात.
या दिवशी भगवान विष्णूंचे विधिवत उपवास आणि पूजा केली जाते. रमा एकादशीला तुम्ही मनोभावे उपवास आणि पूजा केल्यास तुमची सर्व दुःख दूर होतात. या एकादशीला भगवान विष्णूचे उपवास आणि पूजा करण्यासोबतच लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी काही खास उपाय केले जातात. जर लक्ष्मी देवी एखाद्यावर प्रसन्न झाली तर त्यांच्या घराला गरिबी स्पर्श करत नाही असे मानले जाते. तर चला आजच्या या लेखात आपण रमा एकादशीला लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय केले जातात ते जाणून घेऊयात…
रमा एकादशी कधी आहे?
कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 16 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 वाजून 34 मिनिटांनी सुरू होईल. एकादशी तिथी दुसऱ्या दिवशी 17 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजून 12 मिनिटांनी समाप्त होईल. उदयतिथीनुसार रमा एकादशी व्रत शुक्रवार17 ऑक्टोबर रोजी पाळले जाईल.
लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचे खास उपाय
रमा एकादशी तिथीला सकाळी लवकर उठा.
त्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करावे आणि तिला नमस्कार करावा.
यानंतर स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावेत. या दिवशी पांढरे किंवा गुलाबी कपडे घालणे शुभ मानले जाते.
यानंतर देवघरात श्रीयंत्र आणि लक्ष्मी देवीचा फोटो घेऊन पाटावर पुजा मांडून त्यांची पूजा करावी.
श्रीसूक्ताचे पठण करावे. या वेळी लक्ष्मी देवीला कमळाचे फूल अर्पण करावे. असे केल्याने तुमची आर्थिक समस्या दूर होईल आणि दारिद्र्य देखील दूर होईल.
हे काही इतर उपायही करा
रमा एकादशीला काळ्या मुंग्यांना साखर आणि पीठ खायला द्यावे. असे केल्याने तुम्हाला येणारे कामातील अडथळे दूर होतील. लक्ष्मी देवीला शंख, कवडी, कमळाचे बीज, मखाना आणि बताशा खूप आवडतात. रमा एकादशीला देवी लक्ष्मीला हे पदार्थ अर्पण करावेत. लोखंडी भांड्यात पाणी घेऊन त्यात साखर, तूप आणि दूध घालून पिंपळाच्या झाडाच्या सावलीत हे मिश्रण अर्पण करावे. यामुळे घरात कायमचे सुख आणि समृद्धी येते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
