Hanuman Ji Puja Tips | मंगळवारच्या दिवशी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे महाउपाय करा, दूर होईल सर्व दु:ख

श्री हनुमानजींना रामस्तुती अत्यंत प्रिय आहे. असे मानले जाते की जिथे जिथे रामाची कथा आहे किंवा रामाच्या गुणांचे वर्णन केले जाते तिथे हनुमान जी स्वत: उपस्थित राहतात. हनुमानजींशी संबंधित ते उपाय जाणून घेऊया, जे करताच बजरंगबलीची कृपा भक्तांवर होते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात

Hanuman Ji Puja Tips | मंगळवारच्या दिवशी हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी हे महाउपाय करा, दूर होईल सर्व दु:ख
Hanuman Ji

मुंबई : सनातन परंपरेत पवनपुत्र हनुमानजींना शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते. हनुमानजी कलियुगातील सर्वात पूज्य देवता आहेत, त्यांचे नाव घेतल्यानंतर सर्व प्रकारचे त्रास दूर होतात. श्री हनुमानजींच्या पूजेसाठी मंगळवार हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. श्री हनुमानजींना रामस्तुती अत्यंत प्रिय आहे. असे मानले जाते की जिथे जिथे रामाची कथा आहे किंवा रामाच्या गुणांचे वर्णन केले जाते तिथे हनुमान जी स्वत: उपस्थित राहतात. हनुमानजींशी संबंधित ते उपाय जाणून घेऊया, जे करताच बजरंगबलीची कृपा भक्तांवर होते आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात (Do These Upay On Tuesday To Pleased Hanuman Ji For Prosperity And Wealth) –

💠 हनुमानजींची कृपा प्राप्त करण्यासाठी मंगळवारी कोणत्याही मंदिरात जाऊन हनुमानजींना सिंदूर आणि तेल अर्पण करा. हनुमानजींना संतुष्ट करण्याचा हा एक सिद्ध मार्ग आहे, ज्यामुळे इच्छा लवकरच पूर्ण होतात.

💠 श्री हनुमान चालीसाचे पठण हा हनुमानजींची उपासना करण्याचा सोपा मार्ग आहे. जर तुम्ही कोणत्याही कामासाठी हनुमान चालीसाचे दिवसातून सात वेळा पठण केले तर त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

💠 कुठल्याही कार्याची पूर्तता करण्यासाठी हनुमानजींचा अगदी साधा मंत्र ‘ॐ हनुमते नमः’ चा जप पंचमुखी रुद्राक्षच्या जपमाळेने करावा. या मंत्राचा दररोज किमान एक माळ जप करावा.

💠 मंगळवारी श्री हनुमानजींच्या मूर्ती किंवा चित्रासमोर चौमुखी दिवे लावावे. हा उपाय रोज केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतील आणि घरात सुख-संपत्ती असेल.

💠 मंगळवारी स्नान करुन ध्यान केल्यावर अशा पिंपळाच्या झाडाखाली जा जिथे हनुमानजींची मूर्ती प्रतिष्ठीत असेल. तेथे गेल्यावर प्रथम पिंपळ देवाला जल अर्पण करा आणि सात वेळा परिक्रमा करा. यानंतर पिंपळाखाली बसून हनुमान चालीसाचे पठण करावे. तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत हा उपाय सतत करत रहा.

💠 हनुमान चालीसाप्रमाणे हनुमानजींच्या पूजेचे काही मानस मंत्र आहेत. जे श्रद्धापूर्वक जप केल्याने हनुमानजींची कृपा प्राप्त होते. उदाहरणार्थ, एखाद्या प्रकरणात आपल्याला विजय मिळवायचा असेल तर हनुमानजींच्या चित्र किंवा मूर्तीजवळ आपल्या केसची फाईल ठेवा आणि पूर्ण निष्ठेने खालील मंत्राचा जप करा –

पवन तनय बल पवन समाना।

बुधि बिबेक बिग्यान निधाना।।

Do These Upay On Tuesday To Pleased Hanuman Ji For Prosperity And Wealth

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

ShaniDev | शनिदेवांशी नजर का मिळवू नये, कोणाच्या शापाने त्यांची दृष्टी वक्र झाली, जाणून घ्या ही पौराणिक कथा

श्रीकृष्णाच्या नगरीत शनिदेवाचं एक असं सिद्ध मंदिर जिथे डोकं टेकताच दूर होतात सर्व संकट, शनिची वक्रदृष्टीही पडत नाही