शनि अमावस्येच्या दिवशी करा हा सोपा उपाय, पितृदोष होईल झटक्यात दूर
भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्याला यावेळी विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे, कारण यावेळी ही अमावस्या शनिवारी आली आहे. हिंदू धर्मानुसार जी अमावस्या शनिवारी येते तिला शनि अमावस्या असं म्हणतात.

भाद्रपद महिन्यात येणाऱ्या अमावस्याला यावेळी विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे, कारण यावेळी ही अमावस्या शनिवारी आली आहे. हिंदू धर्मानुसार जी अमावस्या शनिवारी येते तिला शनि अमावस्या असं म्हणतात. धर्मशास्त्रामध्ये शनि अमावस्येला विशेष महत्त्व आहे. ही अमावस्या उद्या म्हणजे 23 तारखेला येणार आहे. पारंपरिक मान्यतेनुसार या दिवशी सकाळी उठून स्नान करून पूजापाठ आणि दान केल्यास विशेष पुण्य मिळते. असं देखील म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी दान केल्यास पितृ म्हणजेच आपले पूर्वज प्रसन्न होतात. ते तुम्हाला आशीर्वाद देतात.
ज्योतिषशास्त्रानुसार भाद्रपद महिन्यामध्ये येणाऱ्या या अमावस्येच्या दिवशी काही खास उपाय केले तर तुम्हाला पितृदोषापासून मुक्तता मिळते, तुमचे प्रगतीमधील अडथळे दूर होतात, तुमच्या घरात सुखा शांती येते. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहातो. काय आहेत ते खास उपाय आणि कसे करायचे? याबाबत आज आप माहिती घेणार आहोत.
भाद्रपद अमावस्याच्या दिवशी सकाळी उठून स्नान करा, त्यानंतर दान करा. सायंकाळाच्या वेळी घराच्या ईशान्य दिशेला तुपाचा दिवा लावा आणि कनकधारा स्त्रोताचं पठण करा. हा उपाय केल्यास पितृदोष नष्ट होईल, लक्ष्मी मातेची तुमच्यावर कृपा राहील आणि घरात कधीही पैशांची कमी भासणार नाही.
भाद्रपद अमावस्याच्या दिवशी सकाळी पहाटे स्नान करून, त्यानंतर गाईच्या कच्च्या दुधान महादेवांचा अभिषेक करा, या उपायामुळे तुमच्या सौभाग्यात वाढ होईल, तसेच महादेवांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील, तुमच्या कामांमध्ये जर वारंवार अडथळे येतील असतील तर ते अडथळे दूर होतील.
पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करा, पिंपळाच्या झाडाला 108 प्रदक्षिणा मारा, त्यानंतर गरिबांना, गरजू लोकांना आवश्यक गोष्टींचं दान करा, असं केल्यास पित्रांना मुक्ती मिळेल, ते प्रसन्न होतील आणि तुमची पितृदोषातून सुटका होईल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
