अंत्यसंस्कारावेळी पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर जळत नाही ‘हा’ अवयव, कारण…

हिंदू धर्मात मृतदेहाला अग्नी दिला जातो. मुखाग्नी दिल्यानंतर मृतदेहाचे पार्थिव पूर्णतः जळून खाक होते, फक्त अस्थी शिल्लक राहतात. पण तुम्हाला माहितीये का? आपल्या शरीराचा एक असा अवयव आहे, जो मुखाग्नी दिल्यानंतरही जळत नाही.

अंत्यसंस्कारावेळी पार्थिवाला मुखाग्नी दिल्यानंतर जळत नाही 'हा' अवयव, कारण...
Burn During Cremation
Follow us
| Updated on: Jan 20, 2025 | 8:15 PM

Burn During Cremation : मृत्यू हे जीवनाचे अंतिम सत्य आहे आणि जे कोणीही टाळू शकत नाही. जो व्यक्ती जन्माला येतो, तो व्यक्ती कधी ना कधी मरण पावतो. आपल्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तीला गमावण्याचं दुःख कोणीही व्यक्त करु शकत नाही. यामुळे त्या व्यक्तीवर दुःखाचा डोंगर कोसळतो. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आत्म्याला मुक्ती मिळण्यासाठी त्याच्यावर योग्य पद्धतीनं अंत्यसंस्कार होणे आवश्यक असते. प्रत्येक धर्मात माणसाच्या निधनानंतर अंत्यसंस्कार करण्याची पद्धती ही वेगळी असते. सर्वसामान्यपणे हिंदू धर्मात मृतदेहाला अग्नी दिला जातो. मुखाग्नी दिल्यानंतर मृतदेहाचे पार्थिव पूर्णतः जळून खाक होते, फक्त अस्थी शिल्लक राहतात. पण तुम्हाला माहितीये का? आपल्या शरीराचा एक असा अवयव आहे, जो मुखाग्नी दिल्यानंतरही जळत नाही.

पार्थिवाचा एक अवयव मात्र जळत नाही

हिंदू धर्मात, जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातात. यावेळी मृतदेह चितेवर ठेवून अग्नी दिला जातो. यामुळे काही तासांत शरीरातील अवयवाची जळून राख होते. मुखाग्नी दिल्यानंतर पार्थिव शरीराच्या हाडांचीही राख होते. यानंतर फक्त अस्थी शिल्लक राहतात. मृताच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी पार्थिव अनंतात विलीन झाल्यावर शिल्लक राहिलेल्या अस्थी एका मातीच्या भांड्यात जमा करून नदीमध्ये विसर्जित केल्या जातात. पण त्यावेळी पार्थिवाचा एक अवयव मात्र जळत नाही. तो तसाच राहतो. विशेष म्हणजे हे संशोधनातून सिद्ध झालं आहे.

दातांवर आगीचा काहीच परिणाम होत नाही

पार्थिवाला 670 ते 810 अंश सेल्सिअस तापमानात मुखाग्नी दिल्यानंतर काही तासात शरीर नष्ट होते. मानवी शरीर संपूर्ण जळून जाण्यासाठी साधारणतः दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. माणसाचे शरीर जळून राख झाले तरी त्याचे दात मात्र जळत नाहीत. पार्थिव जळाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अस्थींमध्ये तुम्ही दात हे अगदी सहज ओळखू शकता. यामागील कारण म्हणजे, माणसाचे दात कॅल्शियम फॉस्फेटपासून तयार होतात. त्यामुळे दातांवर आगीचा काहीच परिणाम होत नाही. यामुळे संपूर्ण पार्थिव जळून खाक झाल्यानंतरही दात मात्र तसेच राहतात. यासाठी कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावे नाही.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला
जरांगे माझे मित्र पण, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर सामंतांचा सल्ला.
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार
एकनाथ शिंदेंसाठी कायपण...मुख्यमंत्री 'आपत्ती व्यवस्थापन'चे नियम बदलणार.
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही
आपत्ती व्यवस्थापनात CM-दादा, शिंदेंना वगळलं? म्हणाले;..मला माहिती नाही.
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले...
दादांच्या बैठकीला शिवसेनेचा एकही आमदार नाही, शिंदे स्पष्टच म्हणाले....
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी
पालकमंत्रिपदावरून नाराजी? दादांच्या बैठकीला शिंदेंच्या आमदारांची दांडी.