तुमच्या हातात पुजेचा लाल धागा आहे का? सावधान! आधी हे वाचा
अनेकदा पूजा झाल्यानंतर हातात लाल धागा बांधला जातो. पण हा लाल धागा किती दिवस हातात ठेवावा? जास्त दिवस ठेवल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होतो का? चला जाणून घेऊया सविस्तर

धार्मिक विधी, पूजा किंवा मंदिरात गेल्यानंतर मनगटावर बांधला जाणारा लाल-पीळा धागा (कलावा किंवा मौली) हा संरक्षणाचे प्रतीक मानला जातो. मंत्रांच्या उच्चाराने सिद्ध केलेला हा धागा सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो आणि संकटांपासून रक्षण करतो, अशी श्रद्धा आहे. मात्र, हा धागा अनंतकाळ हातावर ठेवणे योग्य नाही. जर 21 दिवसांनंतरही हा धागा तुमच्या हातावर असेल तर नेमकं काय होतं? चला जाणून घेऊया…
अनेक जण हा धागा महिने किंवा तो आपोआप तुटेपर्यंत हातावर तसाच ठेवतात. पण ही सवय चुकीची ठरू शकते, कारण धाग्यातील मंत्रशक्ती आणि सकारात्मक ऊर्जा मर्यादित कालावधीसाठीच प्रभावी राहते. त्यासाठी २१ दिवसांचा विशेष नियम आहे.
-जास्तीत जास्त २१ दिवस ठेवावा: पूजेदरम्यान बांधलेला धागा मनगटावर फक्त २१ दिवसांपर्यंतच ठेवावा.
-सकारात्मक प्रभाव: या कालावधीत मंत्रांच्या स्पंदनांमुळे धागा शरीरातील चक्रांना (ऊर्जा केंद्रांना) सकारात्मक लहरी पुरवतो.
-२१ दिवसांनंतर धोका: यानंतर धागा जुना होऊन मळतो, त्याची ऊर्जा शोषण्याची क्षमता संपते. जर तो तसाच ठेवला तर बाहेरील नकारात्मक ऊर्जा त्यात साठू लागते, ज्याचा थेट परिणाम मानसिक स्वास्थ्यावर आणि दैनंदिन जीवनावर होऊ शकतो.
धागा अशुद्ध होण्याचेही कारण
दररोजच्या कामात, अंघोळीत किंवा जेवणात हा धागा ओला होतो आणि त्यावर घाण जमा होते. शास्त्रानुसार, अशुद्ध झालेला धागा अंगावर ठेवणे अशुभ मानले जाते. कारण त्यातील सात्विकता नष्ट होते.
जुना धागा काढल्यानंतर काय कराल?
-२१ दिवस पूर्ण झाल्यानंतर किंवा धागा जुनाट झाल्यास तो आदराने काढावा.
-कधीही कचऱ्यात टाकू नये.
-झाडाच्या मुळाशी ठेवावा किंवा वाहत्या पाण्यात (नदीत) विसर्जित करावा.
-शक्यतो मंगळवार किंवा शनिवारी जुना धागा काढून नवीन बांधावा.
हा साधा नियम पाळल्याने आपले संरक्षण कवच नेहमी सकारात्मक आणि प्रभावी राहील. श्रद्धा आणि शास्त्राचा समन्वय साधताना अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
