AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Feng Shui : खिशात पैसा टिकत नाही? मग करा हे सोपे उपाय, पाकीट पैशांनी भरलेले राहील

फेंग शुई हे एक चिनी वास्तूशास्त्र आहे. पूर्वी फेंग शुई हे फक्त चीनमध्येच प्रसिद्ध होतं. परंतु त्यानंतर फेंग शुईचा प्रसार हळुहळु संपूर्ण जगात झाला. घरातील नकारात्मक शक्ती दूर करून सकारात्मक शक्ती वाढवण्यासाठी फेंग शुईमध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत.

Feng Shui : खिशात पैसा टिकत नाही? मग करा हे सोपे उपाय, पाकीट पैशांनी भरलेले राहील
फेंग शुई Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 08, 2026 | 9:39 PM
Share

फेंग शुई हे एक चीन वास्तुशास्त्र आहे. तुमच्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा दूर होऊन, सकारात्मक ऊर्जेच्या निर्मितीसाठी फेंग शुईमध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा त्याच्या घरात वास्तुदोष निर्माण होतात. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास आयुष्यात अचानक काही अडचणी निर्माण होऊ शकतात. जसं की काही कारण नसताना अचानक घरात वादविवादाला सुरुवात होते. पती-पत्नीचं पटत नाही. तसेच आर्थिक समस्या देखील येतात. अनेकांच्या बाबतीत तर असं घडतं की हे लोक पैसे कमावण्यासाठी रात्रंदिवस प्रचंड कष्ट करतात. पैसा देखील कमवतात. परंतु पैसा हातात टिकत नाही. जसा पैसा हातात येतो तसा तो कोणत्या न कोणत्या कामासाठी लगेच खर्च होतो. महिन्याच्या शेवटी बँक खातं रिकामं असतं. अशी परिस्थिती येऊ नये, तसेच हातात आलेला पैसा टिकून रहावा, यासाठी फेंग शुईमध्ये काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. अशाच काही उपायांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

पाकिटात जास्तीत जास्त कॅश ठेवा – सध्या ऑनलाईन पेमेंटचा जमाना आहे, त्यामुळे अनेक लोक हे ऑनलाईन पेमेंटच करतात. आता कॅश व्यवहार करणं टाळतात. त्यामुळे त्यांच्या पाकिटात पैसे देखील नसतात, परंतु फेगं शुई शास्त्रानुसार तुमच्या पाकिटात जर पैसे नसतील तर त्यामुळे तुमच्या भोवती नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा परिणाम हा तुमच्यावर होतो. त्यामुळे पाकिटात कॅश ठेवावी. या उपायामुळे तुमच्या हातात पैसा येण्यास तसेच तुमच्या घराला आर्थिक स्थिरता प्राप्त होण्यास मदत होते. तसेच तुमच्या घराला बरकत प्राप्त होते, असं फेंग शुई शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आपलं पाकिट कधीही रिकामं असू नये, त्यामध्ये पैसे असावेत असं फेंग शुईमध्ये म्हटलं आहे.

पैशांचा क्रम – तुमच्या पाकिटामध्ये जे पैसे आहेत, ते पैसे योग्य क्रमाने ठेवावेत असंही फेगं शुईमध्ये म्हटलं आहे. समजा जर तुमच्याकडे दोनशे, शंभर आणि पन्नास रुपयांची नोट असेल तर ती तुम्ही तुमच्या पाकिटात क्रमानेच ठेवा जसं की आधी दोनशे रुपये, नंतर शंभर रुपये आणि नंतर पन्नास रुपये असा त्याचा क्रम असला पाहिजे, असा सल्ला फेंग शुई शास्त्रामध्ये देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, 'माझं...
अखेर बावनकुळेंचा मनोज जरांगेंच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, “माझं रक्तच तसं नाही जे कोणी...
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; 1.1 कोटींची गुंतवणूक
Third Mumbai | तिसऱ्या मुंबईच्या विकासाला वेग; सिंगापूर करणार 1.1 कोटींची गुंतवणूक अन्...
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट,
तुकाराम मुंढेंचं ‘कॉक्रोच’बाबत विधान अन् सभागृहात टाळ्यांचा कडकडाट, पहा नेमकं काय काय म्हणाले?
राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक...
मोठी बातमी! राज ठाकरेंचा आरोप अन् फडणवीस सरकार ॲक्शन मोडमध्ये! सिद्धिविनायक मंदिरातील कथित देणगी घोटाळ्याची चौकशी होणार
गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना....
Gunratna Sadavarte | पळा, पळा, पळा अरे...जरांगेंचा काळ...गुणरत्न सदावर्तेंचं गाणं चर्चेत; जरांगे पाटलांसह शिंदे-सामंतांना गाण्यातून डिवचलं
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... कारण काय?
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा कारभारावर साधू-महंत नाराज? अचानक... नेमकं काय घडलं?
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा!
FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द...
Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक; मराठ्यांच्या नोंदी रद्द का करता? सरकारला थेट सवाल
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...
शासकीय खुर्चीवर महिला उपध्यक्षांच्या जागेवर पती बसला अन्...  चक्क धनंजय मुंडेंसमोर हे काय घडलं?