गंगेत सापडला तरंगणारा दगड; शास्त्रज्ञांनी सांगितले रहस्य!

पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या गंगा घाटावर एक अद्भुत दृश्य दिसल्याने एकाच चर्चा रंगू लागली आहे.  प्रत्यक्षदर्शींनी जय श्री राम लिहिलेले दोन दगड तरंगताना (floating stone) दिसल्याचा दावा केला आहे. उचलल्यावर या दोन दगडांचे अंदाजे वजन 6 किलो ते 7 किलो असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या तरंगणाऱ्या दगडांना पाहण्यासाठी श्रीरामपूरच्या गंगा (shrirampur ganga ghat) घाटावर […]

गंगेत सापडला तरंगणारा दगड; शास्त्रज्ञांनी सांगितले रहस्य!
नितीश गाडगे

|

Jun 26, 2022 | 3:15 PM

पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या गंगा घाटावर एक अद्भुत दृश्य दिसल्याने एकाच चर्चा रंगू लागली आहे.  प्रत्यक्षदर्शींनी जय श्री राम लिहिलेले दोन दगड तरंगताना (floating stone) दिसल्याचा दावा केला आहे. उचलल्यावर या दोन दगडांचे अंदाजे वजन 6 किलो ते 7 किलो असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या तरंगणाऱ्या दगडांना पाहण्यासाठी श्रीरामपूरच्या गंगा (shrirampur ganga ghat) घाटावर स्थानिकांची एकाच झुंबड उडाली आहे. स्थानिक रहिवासी अन्नपूर्णा दास यांनी सांगितले की, त्यांनी रामायण काळात भगवान श्री राम यांनी दगडांनी पूल बांधल्याबद्दल ऐकले होते, पण आज त्यांनी असा दगड प्रत्यक्षात पाहिला, जो पाण्यात तरंगताना दिसत होता. याबाबत शास्त्रीय माहिती देताना पश्चिम बंगाल विज्ञान मंचचे ज्येष्ठ सदस्य चंदन देबनाथ म्हणाले की, दगडाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असेल तर तो दगड पाण्यात तरंगताना दिसतो.

Floating stone

याशिवाय कोणत्याही पूजेच्या वेळी थर्माकोलवर काळ्या सिमेंटचा लेप लावून अशी एखादी वस्तू नदीत वाहून गेल्याने त्या वस्तूच्या आतील पोकळीमुळे ती नदीत तरंगते.  तज्ज्ञांच्या मते तथाकथित दगड पाहिल्याशिवाय आणि त्याची तपासणी केल्याशिवाय पाण्यात तरंगण्याबाबत स्पष्ट्पणे काहीही सांगता येणे शक्य नाही.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें