AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac Signs | मैत्रीत दगाफटका करु शकतात या 4 राशी, तुमचे मित्र तर नाहीत ना?

मैत्री करणे सोपं असते पण ती अखेरपर्यंत निभावणे प्रत्येकाला जमत नाही (Bad In Friendship). एक चांगला मित्र तोच जो चांगल्या आणि वाईट काळातही तुमच्या सोबत राहातो, तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तुमचं समर्थन करतो.

Zodiac Signs | मैत्रीत दगाफटका करु शकतात या 4 राशी, तुमचे मित्र तर नाहीत ना?
Zodiac Signs
| Updated on: Apr 16, 2021 | 2:49 PM
Share

मुंबई : मैत्री करणे सोपं असते पण ती अखेरपर्यंत निभावणे प्रत्येकाला जमत नाही (Bad In Friendship). एक चांगला मित्र तोच जो चांगल्या आणि वाईट काळातही तुमच्या सोबत राहातो, तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तुमचं समर्थन करतो. काही मित्र आयुष्यभर एकमेकांसोबत राहातात तर काही मित्र काही काळानंतर विभक्त होतात. वेगवेगळं आयुष्य, व्यस्त जीवनशैली आणि एकमेकांशी बोलणे होत नसल्याने कदाचित हे होत असावं (Four Zodiac Signs Who Are Very Bad In Friendship ).

एखाद्याशी दृढ मैत्री करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. या नात्याला टिकवण्याची क्षमता आपल्यात असायला हवी. कारण हे नातं एका छोट्याशा गैरसमजामुळेही तुटू शकते. जेव्हा तुम्ही कुठल्या व्यक्तीसोबत खूप काळसोबत असता तेव्हा तुमची मैत्री अतुट होते.

काही लोकांसाठी हे सोपं असते तर काही लोक याला गृहीत धरतात. त्यामुळे चांगली मैत्रीही तुटू शकते. आज आपण त्या 4 राशींबाबत जाणून घेणार आहोत हे मैत्री निबावण्यात अत्यंत वाईट असतात.

मेष राशी

मेष राशीचे लोक अनेकदा खूप जिद्दी आणि कठोर होऊ शकतात. ते आवेगपूर्ण, स्वकेंद्रित आणि नियंत्रित असतात, ते नेहमी त्यांच्या मित्रांकडे दुर्लक्ष करतात, त्यांना बाजूला सारतात. त्यांचं एक दबंग व्यक्तित्वही आहे, जे त्यांच्या मित्रांसाठी त्रासदायक ठरु शकतं आणि त्यांच्या नात्यांना खराब करु शकतं.

वृषभ राशी

वृषभ राशीचे लोकांना नवीन मित्र बनवणे आणि त्यांच्यासोबत मौजमजा करणे आवडतं, पण एका काळानंतर त्यांना पुन्हा रिचार्ज होण्यासाठी आणि आत्मनिरीक्षण करण्यासाठी काही काळ एकटे राहण्याची आवश्यकता असते. याचा परिणामस्वरुप त्यांच्या मित्रांसोबत एक कम्युनिकेशन गॅप होतो आणि लोकांना वृषभ राशीचे लोकांची ही वागणूक आणि गुप्ततेची सवयीमुळे इतर लोकांना त्रास होतो.

कर्क राशी

कर्क राशीचे लोक मूडी असतात, अति संवेदनशील आणि आवेगपूर्ण असतात. ते सहज कुठल्याही गोष्टीने दु:खी होऊ शकतात, मग भलेही ते त्यांच्या मित्रांनी मौज मस्तीत म्हटलं असेल. यामुळे युक्तिवाद, भांडणे आणि गोंधळ होऊ शकतो.

सिंह राशी

सिंह राशीचे लोक स्वत:समोर कुणालाही पाहात नाहीत. ते आत्मप्रेमी आणि स्वार्थी असतात आणि त्यांनी याबद्दल नक्कीच कुठलीही खंत नसते. त्यांची ही सवय त्यांच्या मित्रांसाठी त्रासदायक ठरु शकतात आणि त्यांना एकटं पाडू शकते. सिंह राशीच्या लोकांना कुणाची काळजी करणे, पोषण करणे आणि मदत करण्याची पद्धत माहिती नसते.

Four Zodiac Signs Who Are Very Bad In Friendship

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | ‘या’ पाच राशीची लोक नकारात्मकता ओळखण्यात असतात एक्सपर्ट

Zodiac sign: ‘या’ पाच राशीचे लोक ऐषोआरामी जीवन जगतात आणि फॅशनेबल राहतात

Zodiac Signs | ‘या’ 4 राशीचे लोक राहतात नेहमी सकारात्मक आणि आनंदात…

फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.