Ashadha Month 2021: मनोकामना पूर्ण करणाऱ्या आषाढ महिन्याला सुरुवात, जाणून घ्या त्याचं महत्व?

| Updated on: Jun 25, 2021 | 3:55 PM

असही मानलं जातं की, याच महिन्यात देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या शयनासाठी निघून जातात. यालाच चातुर्मास म्हटलं जातं. (Fulfillment of desires The beginning of the month of Ashadh, know its importance?)

Ashadha Month 2021: मनोकामना पूर्ण करणाऱ्या आषाढ महिन्याला सुरुवात, जाणून घ्या त्याचं महत्व?
Follow us on

मुंबई : हिंदू धर्मात आषाढ महिन्याला धार्मिकदृष्ट्या मोठं महत्व आहे. हा वर्षाचा चौथा महिना असतो आणि या महिन्यापासूनच चातुर्मास सुरु होतो. देवशयनी एकादशीपासून ते गुप्त नवरात्रीपर्यंतचे सर्व मोठे उत्सव याच महिन्यात येतात. आजपासून आषाढाचा महिना सुरु झाला आहे आणि तो 24 जुलै 2021 पर्यंत चालू राहणार. शास्त्रांमध्ये ह्या महिन्याला मनोकामना पूर्ण करणारा महिना मानला जातो. असं मानलं जातं की, जो कुणी ह्या काळात खऱ्या मनानं भगवान नारायणाची आराधणा करतात त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात.

असही मानलं जातं की, याच महिन्यात देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या शयनासाठी निघून जातात. यालाच चातुर्मास म्हटलं जातं. चातुर्मासात भगवान विष्णू आणि महादेवाच्या पुजेला खास मान आहे. ह्या चातुर्मासाच्या काळात पृथ्वीच्या दायत्वाची जबाबदारी महादेवावर असते. जाणून घेऊया आषाढ महिन्याशी संबंधीत खास गोष्टी.

ह्या महिन्याला आषाढ का म्हटलं जातं आषाढ महिन्याचा संबंध पूर्व आषाढ आणि उत्तर आषाढ नक्षत्राशी आहे. आषाढातल्या
पोर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्वषाढा आणि उत्तराषाढा नक्षत्रांच्या मधात असतो त्यामुळे या महिन्याला आषाढ म्हटलं जातं.

भगवान विष्णूच्या पुजेचं महत्व
आषाढ महिन्यात भगवान विष्णूच्या पुजेला विशेष महत्व आहे. याशिवाय याच महिन्यात दान पुण्याला खास महत्वं दिलं गेलंय. आषाढाच्या महिन्यातच गर्मी आणि उष्णताही असते, त्यामुळे छत्री, पाण्यानं भरलेली घागर, खरबुज, टरबूज, मीठ आणि आवळ्याचं दान चांगलं मानलं जातं.

चार महिन्यांसाठी शुभकार्य बंद
याच महिन्यात देवशयनी किंवा हरीशयनी एकादशी असते. याच दिवशी जगाचे पालनकर्ते भगवान विष्णू चार महिन्यांच्या शयनासाठी निघून जातात. त्यामुळे या काळात सर्व शुभकार्य बंद केली जातात. चार महिन्याच्या ह्या काळाला चातुर्मास म्हटलं जातं. चातुर्मासाची सुरुवात शुक्ल एकादशीला होऊन कार्तिक शुक्ल एकादशीला संपते.

गुप्त नवरात्रीही याच महिन्यात
वर्षभरात चार नवरात्री असतात. माघ, चैत्र, आषाढ, अश्विन या महिन्यात पडतात. चैत्र नवरात्रीला वसंत नवरात्री आणि अश्विन महिन्यातल्या नवरात्रीला शारदीय नवरात्री म्हटलं जातं. इतर दोन नवरात्री ह्या गुप्त नवरात्री म्हटलं जातं. ह्या दोन नवरात्री आषाढ आणि माघ महिन्यात पडतात. गुप्त नवरात्रीतच तांत्रिक पुजा केली जाते.

संबंधित बातम्या

Chanakya Niti | असं धन आणि ज्ञान कोणत्याही कामाचे नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात

Vastu Tips | कुठल्या दिशेचा वास्तुदोष दूर करण्यासाठी कुठल्या देवाची पूजा करावी, जाणून घ्या