AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips | कुठल्या दिशेचा वास्तुदोष दूर करण्यासाठी कुठल्या देवाची पूजा करावी, जाणून घ्या

दिशानिर्देश आणि ऊर्जा या तत्त्वांवर कार्य करते. बांधकाम संबंधित गोष्टींच्या शुभ आणि अशुभ परिणामाबद्दल सांगते. मान्यता आहे की घरात जर वास्तु दोष असेल तर आसपासचं वातावरण नकारात्मक होते. अनेक शुभ कार्यात अनावश्यक अडथळे येतात (Vastu Tips Which God Should Be Worshiped To Remove The Vastu Dosh Of Different Directions).

Vastu Tips | कुठल्या दिशेचा वास्तुदोष दूर करण्यासाठी कुठल्या देवाची पूजा करावी, जाणून घ्या
Vastu_Tips
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jun 23, 2021 | 12:08 PM
Share

मुंबई : वास्तुशास्त्र हे ज्योतिषशास्त्राची एक महत्त्वाची शाखा मानली जाते (Vastu Tips). हे जमीन, दिशानिर्देश आणि ऊर्जा या तत्त्वांवर कार्य करते. बांधकाम संबंधित गोष्टींच्या शुभ आणि अशुभ परिणामाबद्दल सांगते. मान्यता आहे की घरात जर वास्तु दोष असेल तर आसपासचं वातावरण नकारात्मक होते. अनेक शुभ कार्यात अनावश्यक अडथळे येतात (Vastu Tips Which God Should Be Worshiped To Remove The Vastu Dosh Of Different Directions).

वास्तुशास्त्रात, असे म्हटले आहे की वेगवेगळ्या दिशांचे वास्तुदोष दूर करण्यासाठी वेगवेगळ्या देवतांची उपासना करावी. शास्त्रात दहा दिशा असल्याचा उल्लेख आहे. परंतु वास्तु दोष केवळ आठ दिशांचे मानले जातात. कोणत्या दिशेचा दोष दूर करण्यासाठी कोणत्या देवाची पूजा करावी हे जाणून घ्या –

पूर्व दिशा

पूर्वे दिशेचा देव सूर्य मानला जातो. या दिशेने जर वास्तुदोष असेल तर वडील आणि मुलाच्या नात्यात दुरावा, नोकरीची समस्या, यश, प्रतिष्ठा कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. पूर्व दिशेचे वास्तु दोष दूर करण्यासाठी सूर्याला नियमितपणे पाणी द्यावे आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. आपण गायत्री मंत्राचा जप देखील करु शकता.

पश्चिम दिशा

पश्चिम दिशेचे स्वामी भगवान शनिदेव आहेत. या दिशेने वास्तु दोष असल्यास शनि संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. या दिशेचे दोष दूर करण्यासाठी आपण शनिदेवाची उपासना करावी. दर शनिवारी शनि चालीसाचे पठण करावे आणि हनुमानजींसमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

उत्तर दिशा

उत्तर दिशेचे देवता बुध मानले जातात. जेव्हा या दिशेने दोष असतो तेव्हा पैशांच्या समस्या उद्भवतात. त्यांना दूर करण्यासाठी घरात बुध यंत्र बसवा आणि गणपतीचे पूजन करा.

दक्षिण दिशा

ही दिशा मंगळ आणि यमराजची दिशा मानली जाते. दक्षिणेकडील दिशेला दोष असल्यास क्रोध वाढतो आणि परस्पर संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. दक्षिण दिशेचा दोष दूर करण्यासाठी हनुमानजींची नियमित पूजा करावी.

ईशान्य दिशा

उत्तर-पूर्व दिशेला ईशान्य असे म्हणतात. त्याचा स्वामी ग्रह गुरु आणि शिव आहेत. या दिशेने जर वास्तु दोष असेल तर वैवाहिक जीवनात समस्या उद्भवू शकतात. अशा स्थितीत शिव आणि देवी गौरीची पूजा केली पाहिजे. ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ ठेवा.

आग्नेय दिशा

दक्षिण-पूर्व दिशेला आग्नेय म्हणतात. या दिशेचा देव शुक्र आहे. जर या दिशेने वास्तु दोष असेल तर भौतिक सुखांचा अभाव, अयशस्वी प्रेम संबंधांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याचे दोष दूर करण्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा करावी आणि शुक्र यंत्र स्थापित करुन नियमित पूजा करावी.

नैऋत्य दिशा

दक्षिण-पश्चिम दिशेला नैऋत्य म्हणतात. त्याचा स्वामी राहू-केतु आहे. या दिशेचा दोष दूर करण्यासाठी भगवान शिवला दररोज जल अर्पण करावे आणि सात प्रकारचे धान्य राहू-केतुनिमित्त दान करा.

वायव्य दिशा

उत्तर-पश्चिम दिशेला वायव्य म्हणतात. या दिशेचा स्वामी चंद्रदेव आहे. जर या दिशेने वास्तु दोष असेल तर तेथे तणाव, सर्दी, मानसिक समस्या आणि प्रजननसंबंधी समस्या उद्भवतात. यावर मात करण्यासाठी चंद्रदेव मंत्रांचा जप करा आणि महादेवाची पूजा करावी.

Vastu Tips Which God Should Be Worshiped To Remove The Vastu Dosh Of Different Directions

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips : चिमूटभर मीठ दूर करेल तुमच्या सर्व समस्या, घरात सुख-समृद्धी येईल

Vastu Tips | लग्नात अडथळे येत असतील तर हे उपाय करा, दूर होईल वास्तुदोष

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं