Vastu Tips | लग्नात अडथळे येत असतील तर हे उपाय करा, दूर होईल वास्तुदोष

वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूच्या निर्माण आणि देखभाल करण्यासंदर्भात योग्य दिशा (Having Problem In Marriage) आणि नियम दिले गेले आहेत. वास्तुचे नियम न पाळल्याने वास्तु दोष उद्भवतात. ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह लागते. त्याचबरोबर आयुष्यात समस्या उद्भवू शकतात आणि प्रगती होत नाही.

Vastu Tips | लग्नात अडथळे येत असतील तर हे उपाय करा, दूर होईल वास्तुदोष
marriage Image

मुंबई : वास्तुशास्त्रामध्ये प्रत्येक वस्तूच्या निर्माण आणि देखभाल करण्यासंदर्भात योग्य दिशा (Having Problem In Marriage) आणि नियम दिले गेले आहेत. वास्तुचे नियम न पाळल्याने वास्तु दोष उद्भवतात. ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह लागते. त्याचबरोबर आयुष्यात समस्या उद्भवू शकतात आणि प्रगती होत नाही. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही घरातील नकारात्मकता दूर यशस्वी होऊ शकता (If You Are Having Problem In Marriage Do These Upay Of Vastu Tips).

असे बरेच लोक आहेत ज्यांना लग्नासंदर्भात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काहीजणांचे वय वाढते परंतु त्यांना योग्य जोडीदार मिळत नाहीत. अशा परिस्थितीत समाजातील लोक मुला-मुलींमध्ये कमतरता शोधू लागतात. पण, वास्तूदेखील लग्नातील अडथळ्यांचे एक कारण असू शकते. वास्तुमध्ये काही उपायांचा उल्लेख केला आहे, ज्याच्या सहाय्याने एखाद्याला लग्नात येणाऱ्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकते.

वास्तू टिप्स –

💠 घरात सकारात्मक ऊर्जा वाढविण्यासाठी फुलांचं फार महत्व आहे. परंतु, बेडरुममध्ये हिरवी झाडं आणि ताजे पुष्पगुच्छ कधीही ठेवू नये. वास्तुनुसार फुले, झाडे आणि वेली हे लाकडाच्या घटकाचे प्रतीक आहेत. हे बेडरुममध्ये ठेवल्यास विवाहामध्ये अडथळा निर्माण होतो.

✳️ विवाह योग्य तरुणींनी त्यांच्या खोलीत फुलांची पेंटिंग लावावी. फुले सौंदर्य, प्रेम आणि रोमॅन्सचे प्रतीक आहेत. घराच्या ड्रॉईंगरुममध्ये फुलांची पेंटिंग लावल्याने विवाह योग्य मुलींसाठी चांगली स्थळ येऊ लागतात.

💠 वास्तुनुसार उत्तम पती मिळण्यासाठी भगवान शिवची भक्तीभावाने पूजा करावी. शक्य असल्यास 16 सोमवारी उपवास ठेवा.

✳️ घराचे पश्चिम आणि वायव्य कोपरा स्वच्छ आणि नीटनेटका ठेवा. यामुळे या दिशेने सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो, ज्यामुळे चांगल्या संबंधांची शक्यता वाढते.

💠 जर कुमारीका मुली पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करतील तर त्यांना सर्वोत्तम नवरा प्राप्त होईल.

✳️ ज्या खोलीत एकापेक्षा अधिक दारवाजे असतात त्या खोलीत विवाह योग्य तरुणींनी झोपावे. ज्या खोलीत हवा आणि प्रकाश कमी प्रमाणात प्रवेश करत असेल अशा खोलीत झोपू नये. अशा परिस्थितीत लग्नात अडथळे आणतात.

💠 आपल्याला लग्न करायचे असेल परंतु काही अडथळे येत असतील तर काळ्या रंगापासून दूर राहा. हा रंग निराशेचे प्रतीक मानला जातो. यासह, हा रंग राहू, केतू आणि शनि यांचे प्रतिनिधित्व करतो. ज्यामुळे कामात अडथळे निर्माण होतात.

If You Are Having Problem In Marriage Do These Upay Of Vastu Tips

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | घरात चुकूनही या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नका, नुकसान होऊ शकते

Vastu Tips : चिमूटभर मीठ दूर करेल तुमच्या सर्व समस्या, घरात सुख-समृद्धी येईल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI