Vastu Tips | घरात चुकूनही या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नका, नुकसान होऊ शकते

कुंडलीतील पितृ दोषाच्या समस्येवर मात करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय सांगितले गेले आहेत (Vastu Tips). याशिवाय वास्तुदोषातही पूर्वजांचे फोटो लावण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देण्यास सांगितले गेले आहे.

Vastu Tips | घरात चुकूनही या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नका, नुकसान होऊ शकते
Pitra

मुंबई : कुंडलीतील पितृ दोषाच्या समस्येवर मात करण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय सांगितले गेले आहेत (Vastu Tips). याशिवाय वास्तुदोषातही पूर्वजांचे फोटो लावण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देण्यास सांगितले गेले आहे. बरेच लोक त्यांच्या घरातील वडीलधाऱ्यांचे फोटो त्यांच्या मृत्यूनंतर देवी-देवतांच्या चित्रांसह ठेवतात, जेणेकरुन त्यांचा आशीर्वाद त्यांच्यावर राहील (Vastu Tips Where To Keep Photos Of Pitra At Home To Avoid Vastu Dosh).

💠 धर्मग्रंथानुसार, पूर्वजांचे फोटो देवाच्या चित्रासह ठेवू नये. यामुळे घरात अशुभता वाढते. वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे चित्र योग्य दिशेने ठेवल्यास कुटुंबावर कृपा राहते आणि घरातील सदस्यांना फायदा होतो.

💠 वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचे फोटो लावताना लक्षात ठेवा की त्यांची पूजा नेहमीच दक्षिण आणि पश्चिम दिशेला व्हावी. उत्तर आणि पूर्वेची दिशा ही ईश्वराची दिशा मानली जाते. या दिशेने पूर्वजांची चित्रे ठेवल्याने देवता रागावतात.

💠 वास्तुशास्त्रानुसार, पूर्वजांचे फोटो पूजा घराच्या भिंतींवर लावू नये. हे फोटो लावल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

💠 वास्तुनुसार, बेडरुममध्ये, पायऱ्या आणि स्वयंपाक घराच्या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावू नये. यामुळे घरात वाद उद्भवतात. जर आपण घराच्या मध्यभागी पूर्वजांचे चित्र ठेवले तर आपल्या मान-सन्मानाला नुकसान पोहोचू शकते.

💠 पूर्वजांचे चित्र अशा ठिकाणी ठेवू नका जिथे आपले लक्ष नेहमी-नेहमी जात असेल, यामुळे घरात समस्या उद्भवू शकतात.

💠 आपण पूर्वजांचे फोटो हॉलच्या दक्षिणेकडील दिशेने किंवा घराच्या मुख्य खोलीत ठेवू शकता.

💠 कुटुंबासमवेत पूर्वजांची छायाचित्रे लावू नका. वास्तुच्या मते घरातील जिवीत व्यक्तींबरोबर पूर्वजांचे फोटो लावणे अशुभ आहे. मान्यता आहे की, ज्या जिवंत व्यक्तीसह पूर्वजांचे फोटो लावले जातात त्याचा त्यांच्यावर नकारात्मक प्रभाव पडतो.

💠 पूर्वजांचे फोटो ठेवताना लाकडी पुठ्याचा आधार असावा. ज्यामुळे फोटो लटकताना दिसावे.

Vastu Tips Where To Keep Photos Of Pitra At Home To Avoid Vastu Dosh

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात हनुमानजींचा फोटो लावा, सर्व समस्या होतील दूर

Vastu Tips : जीवनातील समस्या सोडवण्यासाठी घरात याप्रकारे करा गंगाजलचा वापर, सुख-समृद्धी नांदेल

Vastu Tips | जर अति राग येत असेल, तर घरात वास्तुनुसार हे बदल करा…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI