Chanakya Niti | असं धन आणि ज्ञान कोणत्याही कामाचे नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Nupur Chilkulwar

Updated on: Jun 25, 2021 | 7:21 AM

चाणक्य नीतिच्या काही वचनांमध्ये, आचार्य यांनी संपत्तीचा खरा मित्र आणि शिक्षणाची सर्वात मोठ्या संपत्तीचं वर्णन केलं आहे. परंतु काही खास परिस्थितींचा उल्लेख देखील केला आहे, ज्यामध्ये पैसे आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा उपयोग होत नाही (Chanakya Niti Such Knowledge And Wealth Are Useless According To Acharya Chanakya).

Chanakya Niti | असं धन आणि ज्ञान कोणत्याही कामाचे नाही, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय म्हणतात
Acharya_Chanakya

मुंबई : आचार्य चाणक्य (Chanakya Niti)स्वत: एक शिक्षक तसेच कुशल अर्थतज्ज्ञ होते, म्हणूनच त्यांना शिक्षण आणि संपत्तीचे महत्त्व फार चांगल्याने समजले होते. चाणक्य नीतिच्या काही वचनांमध्ये, आचार्य यांनी संपत्तीचा खरा मित्र आणि शिक्षणाची सर्वात मोठ्या संपत्तीचं वर्णन केलं आहे. परंतु काही खास परिस्थितींचा उल्लेख देखील केला आहे, ज्यामध्ये पैसे आणि शिक्षण या दोन्ही गोष्टींचा उपयोग होत नाही (Chanakya Niti Such Knowledge And Wealth Are Useless According To Acharya Chanakya).

आचार्य चाणक्य विलक्षण प्रतिभेचे धनी होते आणि सर्व विषयांचे जाणकार होते. त्यांचे विचार ऐकायला कठीण वाटतात, परंतु जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या विचारांचे आयुष्यात अनुसरण केले तर ती सर्व मोठ्या अडचणींवर सहज विजय मिळवू शकते आणि व्यक्तिमत्त्व सुधारु शकते. चाणक्य नितीत शिक्षण आणि संपत्ती याबद्दल आचार्य यांनी काय म्हटले आहे ते जाणून घेऊ –

पुस्तकेषु च या विद्या परहस्तेषु च यद्धनम् उत्पन्नेषु च कार्येषु न सा विद्या न तद्धनम्

या श्लोकाद्वारे आचार्य म्हणतात की जे ज्ञान फक्त पुस्तकात आहे आणि जी संपत्ती इतरांच्या हाती गेली आहे, ते कोणाच्याही उपयोगाचे नाही.

आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्ञान ही संपत्ती आहे जी वितरीत केल्याने आणखी वाढते. परंतु जे ज्ञान केवळ पुस्तकांपुरते मर्यादित आहे आणि व्यावहारिकतेशी त्याचं काहीही देणे-घेणे नाही, ते ज्ञान निरुपयोगी आहे. असे ज्ञान कोणालाही कधीच उपयोगी पडत नाही. पुस्तके वाचून ज्ञान ग्रहण करावे, परंतु ते ज्ञान व्यावहारिक गोष्टींमध्ये वापरले पाहिजे, तरच त्या ज्ञानाचा अर्थ आहे. फक्त पुस्तकी गोष्टी लक्षात ठेवण्याने काहीही होत नाही. म्हणून, आपण प्राप्त केलेले ज्ञान, प्रत्यक्षात आणा.

जी व्यक्ती दुसर्‍याला पैसा देते, तो पैसा कधीच वेळेवर कामात येत नाही. पैसे नेहमी आपल्याकडे सुरक्षित ठेवले पाहिजेत जेणेकरुन गरजेच्या वेळी त्या पैशांचा योग्य वापर होऊ शकेल. या प्रकरणात कोणावरही विश्वास ठेवू नये.

Chanakya Niti Such Knowledge And Wealth Are Useless According To Acharya Chanakya

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | अशी व्यक्ती डोळे असूनही आंधळी असते, तिच्यापेक्षा मुर्ख या जगात कोणीही नाही

Chanakya Niti | अशी माणसं काळ्या सर्पापेक्षाही अधिक खतरनाक असतात, यांच्यापासून नेहमी सावध राहा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI