Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या ‘या’ गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: Nupur Chilkulwar

Updated on: Jun 23, 2021 | 7:37 AM

आचार्य यांनी आयुष्यात कठोर परिस्थितींची सामना केला आहे. पण परिस्थितीपुढे ते कधीच त्यांनी गुडघे टेकले नाही. तर त्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास त्यांनी केला आणि आयुष्यभर काहीतरी शिकत राहिले (Acharya Chanakyas These Things Make You Aware About The Truth Of Life In Chanakya Niti).

Chanakya Niti | आचार्य चाणक्य यांच्या 'या' गोष्टी तुम्हाला जीवनाचं खरं दर्शन घडवतील, नेहमी लक्षात ठेवा
Chanakya Niti

मुंबई : आचार्य चाणक्य एक महान विद्वान होते आणि त्यांना (Acharya Chanakya) अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राजकारण इत्यादी विषयांतील तज्ज्ञ मानल्या जात होते. आचार्य यांनी आयुष्यात कठोर परिस्थितींची सामना केला आहे. पण परिस्थितीपुढे ते कधीच त्यांनी गुडघे टेकले नाही. तर त्या परिस्थितीचा बारकाईने अभ्यास त्यांनी केला आणि आयुष्यभर काहीतरी शिकत राहिले (Acharya Chanakyas These Things Make You Aware About The Truth Of Life In Chanakya Niti).

आचार्य यांनी आपल्या अनुभवांनी जनसामान्यांचे कल्याण केले. चाणक्य नीति नावाच्या ग्रंथात त्यांनी मानवी कल्याणाशी संबंधित अशा सर्व गोष्टींचा उल्लेख केला आहे जो आजच्या काळातही प्रत्येकासाठी उपयुक्त ठरतो आणि प्रतिकूल काळात लोकांना मार्गदर्शन करतो.

दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः सर्पो दंशति काले तु दुर्जनस्तु पदे पदे

आचार्य या श्लोकाद्वारे सांगतात की काळ्या सर्पापेक्षा वाईट व्यक्ती जास्त प्राणघातक आहे. जेव्हा धोका वाटतो तेव्हाच साप चावतो. परंतु वाईट व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत आपले नुकसान करु शकतो. आपल्याला चुकीचा मार्ग दाखवतो आणि आपला मान-सन्मान कमी करते. म्हणून नेहमी अशा संगतीपासून दूर रहा.

त्यजन्ति मित्राणि धनैर्विहीनं पुत्राश्च दाराश्च सुहृज्जनाश्च तमर्शवन्तं पुनराश्रयन्ति अर्थो हि लोके मनुषस्य बन्धु:

मित्र, स्त्री, मुलगा, भाऊ किंवा बहीण, नोकरदार, सर्व लोक हे तोपर्यंत त्या व्यक्तीसोबत राहतात जोपर्यंत त्याच्याकडे पुरेसे पैसे आहेत. जेव्हा पैसे संपतात तेव्हा हे लोक त्यापासून दूर जाऊ लागतात आणि पैसे आल्यावर परत येतात. म्हणूनच, जगात एखाद्या व्यक्तीचा खरा साथीदार म्हणजे पैसा.

अन्यायोपार्जितं वित्तं दशवर्षाणि तिष्ठति प्राप्ते चैकादशे वर्षे समूलं तद् विनश्यति

परिस्थिती काशीही असो, परंतु चुकीच्या मार्गाने कधीही पैसे कमवू नका. चुकीच्या मार्गाने कमावलेली रक्कम 10 वर्षांपेक्षा जास्त काळ टिकत नाही. 11 व्या वर्षाच्या सुरुवातीला व्याज आणि मुद्दलसह नष्ट होते.

प्रलये भिन्नमार्यादा भविंत किल सागर: सागरा भेदमिच्छन्ति प्रलेयशपि न साधव:

महासागराला धैर्यवान मानलं जातं. पण, जेव्हा आपत्ती येते तेव्हा महासागर देखील आपल्या मर्यादा ओलांडतो. पण, सज्जन माणसाचा संयम संकटकाळात संपत नाही. त्याचा संयमच भविष्यात त्याच्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाचे कारण बनतो.

Acharya Chanakyas These Things Make You Aware About The Truth Of Life In Chanakya Niti

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Chanakya Niti | आयुष्यात कधीही यशस्वी होत नाहीत या दोन प्रकारच्या व्यक्ती, जाणून घ्या आचार्य चाणक्य काय सांगतात

Chanakya Niti | अशी व्यक्ती डोळे असूनही आंधळी असते, तिच्यापेक्षा मुर्ख या जगात कोणीही नाही

Chanakya Niti | अशी माणसं काळ्या सर्पापेक्षाही अधिक खतरनाक असतात, यांच्यापासून नेहमी सावध राहा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI