AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2021 Aarti | गणपतीची आरती पाठ झाली का? बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी वाचा या तीन आरत्या

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सव अवघ्या दोन दिवसांवर आलाय. गणेश चतुर्थी यावर्षी 10 सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. या दिवसापासून सुरु होणारा गणेश महोत्सव दहा दिवस चालणार असून 21 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन असेल.

Ganesh Chaturthi 2021 Aarti | गणपतीची आरती पाठ झाली का? बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी वाचा या तीन आरत्या
Ganesha Arati
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 10:00 AM
Share

Ganesh Chaturthi 2021 : मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीगणेश यांचा 10 दिवसांचा उत्सव म्हणजेच गणेशात्सव अवघ्या दोन दिवसांवर आलाय. गणेश चतुर्थी यावर्षी 10 सप्टेंबर रोजी साजरी केली जाईल. या दिवसापासून सुरु होणारा गणेश महोत्सव दहा दिवस चालणार असून 21 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जन असेल. या दिवसांमध्ये गणपतीला प्रसन्न करण्यासाठी गणेश भक्त घरात, मंदिरांमध्ये आणि विविध मंडळांमध्ये गणेशाची पूजा करतात. त्यांना शेंदूर, दुर्वा, नैवेद्य अर्पण करतात. त्यांची आरती गातात.

गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या काही प्रसिद्ध आरती आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहेत.

आरती- सुखकर्ता दुखहर्ता…

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची। सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची। कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती। दर्शनमात्रे मन कामनांपुरती॥ जय देव…

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा। चंदनाची उटी कुंकुमकेशरा। हिरेजड़ित मुकुट शोभतो बरा। रुणझुणती नूपुरे चरणी घागरीया॥ जय देव…

लंबोदर पीतांबर फणीवर बंधना। सरळ सोंड वक्रतुण्ड त्रिनयना। दास रामाचा वाट पाहे सदना। संकष्टी पावावें, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना॥ जय देव…

आरती : जय गणेश जय गणेश जय गणेश देवा

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा। माता जाकी पार्वती पिता महादेवा एकदन्त दयावन्त चारभुजाधारी माथे पर तिलक सोहे, मूसे की सवारी पान चढ़े फूल चढ़े और चढ़े मेवा लड्डुअन का भोग लगे सन्त करे सेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा। माता जाकी पार्वती पिता महादेवा ||

अँधे को आँख देत कोढ़िन को काया बाँझन को पुत्र देत निर्धन को माया सूर श्याम शरण आए सफल कीजे सेवा माता जाकी पार्वती पिता महादेवा जय गणेश जय गणेश जय गणेश देवा। माता जाकी पार्वती पिता महादेवा ||

जय गणेश जय गणेश जय गणेश देवा। माता जाकी पार्वती पिता महादेवा माता जाकी पार्वती पिता महादेवा माता जाकी पार्वती पिता महादेवा ||

आरती : शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको। दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको। हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको। महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि। विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी। कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी। गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥

भावभगत से कोई शरणागत आवे। संतती संपती सबही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे। गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥ जय जय श्री गणराज विद्या सुखदाता। धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥

संबंधित बातम्या :

Ganesh Chaturthi 2021 : पूजा विधी, व्रत विधी, मंत्र आणि बरेच काही जाणून घ्या या विशेष सणाबद्दल

Ganesh Chaturthi 2021 : गणपतीला का प्रिय आहे मोदक, जाणून घ्या काय आहे मान्यता !

महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.