AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganeshotsav 2021 | गणपती बाप्पाला कोणती फुलं वाहावी आणि कोणती वाहू नये

गणेशोत्सवाला गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आहे. हा सण 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2021 म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत चालणार आहे. या 10 दिवसांसाठी गणपतीची पूजा केली जाते. हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. प्रत्येकजण आदरपूर्वक गणेशाची पूजा करतो. बाप्पाला लाल आणि पिवळा रंग आवडतो.

Ganeshotsav 2021 | गणपती बाप्पाला कोणती फुलं वाहावी आणि कोणती वाहू नये
ganesha Puja
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Sep 12, 2021 | 12:14 PM
Share

मुंबई : गणेशोत्सवाला गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आहे. हा सण 10 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2021 म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत चालणार आहे. या 10 दिवसांसाठी गणपतीची पूजा केली जाते. हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. प्रत्येकजण आदरपूर्वक गणेशाची पूजा करतो. बाप्पाला लाल आणि पिवळा रंग आवडतो.

सकाळी स्नान केल्यानंतर गणपतीची विधीवत पूजा करा. पूजेमध्ये गणपतीला आपली आवडती फुले आणि दुर्वा अर्पण करा. असे केल्याने तुमचे सर्व त्रास दूर होतील. तसेच, कोणत्या गोष्टी देऊ नयेत हे लक्षात ठेवा. शास्त्रात असेही म्हटले आहे की, ज्या देवाची तुम्ही पूजा करता त्याला प्रिय वस्तू अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. गणपतीला कोणती फुले अर्पण करावी आणि कोणती नाहीत हे जाणून घेऊया.

केतकी फुले

केतकीची फुले गणपतीला अर्पण केली जात नाहीत. पौराणिक मान्यतेनुसार, केतकीची फुले भगवान शिव यांना अप्रिय आहेत. म्हणून गणपतीलाही ती अर्पण करु नये.

तुळस

शास्त्र आणि पुराणात म्हटले आहे की ‘न तुलस्या गणाधिपम्’. याचा अर्थ गणपतीला तुळस अर्पण करु नये. एकदा तुळशीजींनी गणपतीला लंबोदर म्हणून लग्न करण्यास नकार दिला होता. तेव्हा गणेशजींनी तुळशीला शाप दिला होता आणि तेव्हापासून गणेशाला तुळस अर्पण करणे निषिद्ध मानले जाते.

वाळलेली शिळी फुले

पूजेमध्ये गणपतीला कोरडी आणि शिळी फुले देऊ नयेत. त्याच्या पूजेमध्ये कोरडी फुले अर्पण करणे अशुभ मानले जाते आणि असे मानले जाते की यामुळे घरात दारिद्र्य येते.

जास्वंदाची फुले

जास्वंदाची लाल आणि पिवळी फुले गणेशाला खूप प्रिय आहेत. म्हणून ही फुले अर्पण केल्याने गणपती लवकर प्रसन्न होतात आणि त्यांच्या भक्तांचे सर्व त्रास दूर करतात.

झेंडूची फुले

झेंडूची फुले प्रामुख्याने गणेशजीला अर्पण करावीत. हे फूल गणेशजींना खूप प्रिय आहेत. पूजेमध्ये ही फुले अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होतात.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Ganesh Festival 2021 | संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा, गणपती बाप्पा तुमची सगळी विघ्नं दूर करेल

Ganesh Chaturthi 2021 : गणेशोत्सवादरम्यान या चार चुका अवश्य टाळा, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...