Ganpati Puja Tips | गणपतीची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा, बाप्पा प्रसन्न होतील, पूर्ण होईल सर्व मनोकामना

प्रथमपूज्य गणपतीच्या पूजेसाठी बुधवार खूप शुभ मानला जातो. या दिवशी रिद्धी-सिद्धीचे दाता गजाननची उपासना केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात. आज आपण हे जाणून घेऊया की गणपतीच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टी अर्पण केल्याने बाप्पांचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात

Ganpati Puja Tips | गणपतीची पूजा करताना या गोष्टी लक्षात ठेवा, बाप्पा प्रसन्न होतील, पूर्ण होईल सर्व मनोकामना
Lord Ganesha
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 2:25 PM

मुंबई : प्रथमपूज्य गणपतीच्या पूजेसाठी बुधवार खूप शुभ मानला जातो. या दिवशी रिद्धी-सिद्धीचे दाता गजाननची उपासना केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनात येणारे सर्व अडथळे दूर होतात. आज आपण हे जाणून घेऊया की गणपतीच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टी अर्पण केल्याने बाप्पांचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात (Ganpati Puja Tips Wednesday Remedies For Get Blessings From Ganesha) –

? बुधवारी गणपतीच्या पूजेमध्ये अक्षता अर्पण करा. गणपतीला कधी कोरड्या अक्षता अर्पण करु नका. गणपतीला अक्षता अर्पण करण्यापूर्वी त्या पाण्याने धुवावे आणि‘इदं अक्षतम् ॐ गं गणपतये नम:’ हा जप करत असताना अर्पण करा.

? श्री हनुमान जी प्रमाणे गणपतीलाही सिंदूर अर्पण केला जातो. गणपतीच्या पूजेमध्ये सिंदूर अर्पण केल्यास घरात कोणत्याही प्रकारची वाईट आत्मा किंवा नकारात्मक ऊर्जा येऊ शकत नाही. सिंदूर अर्पण करुन प्रसन्न झाल्यामुळे गणपती त्याच्या भक्ताला खूप शुभ फळ देतात.

? गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वाचे मोठे महत्त्व आहे. गणपतीच्या पूजेमध्ये अर्पण केलेली दुर्वा हिरवी हवी. सुकलेली दुर्वा बाजूला ठेवा. गणपतीला अर्पण करण्यात येणाऱ्या दुर्वाचा वरचा भागच नेहमी घ्यावा. श्रीगणेशाला एकवीस दुर्वा अर्पण करणे खूप शुभ मानले जाते.

? कोणत्याही देवाच्या पूजेमध्ये फुलांना खूप महत्त्व असते. जर तुम्ही देवाला अनुकूल फुले अर्पण केलीत तर त्यावर ते देव प्रसन्न झाल्यास तुम्हाला आशीर्वाद लवकरच मिळेल. गणपतीला कुठलेही फुल अर्पण करु शकता. परंतु पूजेमध्ये आपण झेंडूच्या पिवळ्या फुलांचे किंवा झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करणे आवश्यक आहे, जे गणेशाला फारच प्रिय आहेत.

? आपण गणपतीच्या पूजेमध्ये सर्व प्रकारचे पदार्थाचे नैवेद्य देऊ शकता, परंतु त्यांची पूजा मोदकांशिवाय अपूर्ण मानली जाते. मोदकाचा प्रसाद दिल्यावर श्री गणेशजी लवकरच प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देतात. जर कोणत्याही कारणास्तव मोदक उपलब्ध नसेल तर आपण प्रसादसाठी बुंदीचे लाडवाचं नैवेद्य दाखवू शकता.

? पूजेचे शुभ फळ मिळण्यासाठी प्रत्येकजण देवतांना फळे अर्पण करतात. गणपतीच्या साधनेचे शुभ फळ मिळण्यासाठी त्यांनी केळी अर्पण करा. कारण, गणेशाला फळांमध्ये केळी अत्यंत प्रिय आहे. ज्याचे नैवेद्य दाखवल्यावर ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताला सुख आणि समृध्दी देतात.

? बुधवारी श्री गणेश चालीसाचे पठण केल्याने गणपती प्रसन्न होतात आणि सुख आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात.

Ganpati Puja Tips Wednesday Remedies For Get Blessings From Ganesha

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Untold Story | संतोषी मातेचा जन्म कसा झाला, भगवान गणेशासोबत त्यांचं नातं काय?

Vinayaka Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, या शुभ मुहूर्तात पूजा केल्याने सर्व विघ्न टळतील

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.