AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Untold Story | संतोषी मातेचा जन्म कसा झाला, भगवान गणेशासोबत त्यांचं नातं काय?

बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो. गणपती बुद्धीदाता देण्याबरोबरच शुभकर्ता मानले जातात. जिथे सर्व काही शुभ आहे तेथे कधीही अडथळे येऊ शकत नाहीत. म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जाते. गणेशजींचे रिद्धी-सिद्धिशी लग्न झाले होते आणि शुभ-लाभ त्यांचे दोन पुत्र असल्याचे म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे काय की भगवान गणेशाची एक कन्या देखील होती?

Untold Story | संतोषी मातेचा जन्म कसा झाला, भगवान गणेशासोबत त्यांचं नातं काय?
Santoshi Mata Birth Story
| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 14, 2021 | 11:29 AM
Share

मुंबई : बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो. गणपती बुद्धीदाता देण्याबरोबरच शुभकर्ता मानले जातात. जिथे सर्व काही शुभ आहे तेथे कधीही अडथळे येऊ शकत नाहीत. म्हणूनच गणपतीला विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जाते. गणेशजींचे रिद्धी-सिद्धिशी लग्न झाले होते आणि शुभ-लाभ त्यांचे दोन पुत्र असल्याचे म्हटले जाते. पण तुम्हाला माहिती आहे काय की भगवान गणेशाची एक कन्या देखील होती? (Who is Santoshi Mata what is her relation with Lord Ganesha And what is the birth story of Santoshi Mata)

आपण ज्या संतोषी देवीची शुक्रवारी पूजा करतो. त्यांना संतुष्ट करण्यासाठी तुम्ही अगदी कडक नियमांचे व्रत ठेवता. त्या भगवान गणेशाची कन्या आणि शुभ-लाभच्या बहिण आहेत. देवी संतोषी या प्रेम, क्षमा, संतोष आणि आशेचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की जर एखादी व्यक्ती देवी संतोषीची पूजा करते किंवा 16 शुक्रवारपर्यंत उपवास ठेवतात, तर तिला देवीचे अनेक आशीर्वाद मिळतात आणि त्यांचे सर्व दु:ख दूर होतात. संतोषी देवीच्या जन्माची कहाणी खूप रंजक आहे. देवी संतोषीच्या जन्माची कहाणी जाणून घ्या.

देवी संतोषीच्या जन्माची कहाणी

पौराणिक कथेनुसार, एकदा भगवान गणपती आपल्या बहिणीकडून रक्षासूत्र बांधून घेत होते आणि भेटवस्तूची देवाण-घेवाण सुरु होती. मग त्यांच्या मुलांनी गणेशजींना या विधीबद्दल विचारले. तेव्हा गणेश जी म्हणाले की हा धागा नाही तर रक्षासूत्र आशीर्वाद आणि भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा प्रतीक आहे. हे ऐकून शुभ-लाभ खूप उत्साही झाले आणि त्यांनी गणेशजींना सांगितले की त्यांनाही एक बहीण हवी आहे, जेणेकरुन त्यांनाही हा रक्षासूत्र कुणी बांधवा.

शुभ-लाभची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवान गणेशाने आपल्या शक्तींमधून एक ज्योत निर्माण केली आणि रिद्धि-सिद्धि या दोन्ही पत्नींच्या आत्म्यशक्तीच्या सामर्थ्याने त्याला एकत्र केलं. काही काळानंतर या ज्योतीने मुलीचे रुप घेतले, जिचे नाव संतोषी ठेवण्यात आले. तेव्हापासून ती मुलगी संतोषी माता म्हणून ओळखली जाऊ लागली. संतोषी माता यांचा जन्म शुक्रवारी झाला असल्याने त्यांची पूजा आणि व्रत फक्त शुक्रवारीच केले जातात.

श्री गणेशाची फॅमिली ट्री

– भगवान गणेशाच्या आई-वडिलांचे नाव शिव-पार्वती आहे.

– भाऊ कार्तिकेय आणि बहीण अशोक सुंदरी आहे. सुकेश, जालंधर, अयप्पा आणि भूमा हे देखील गणेशाचे भाऊ असल्याचे म्हटले जाते.

– गणेशाच्या पत्नींचे नाव रिद्धि-सिद्धी, मुलांचे नाव शुभ-लाभ आणि मुलीचे नाव संतोषी आहे.

– तुष्टी आणि पुष्टी या शुभ-लाभच्या पत्नी आणि गणेशाच्या सून आहे.

– आमोद आणि प्रमोद हे गणेशाचे नातू आहेत.

Who is Santoshi Mata what is her relation with Lord Ganesha And what is the birth story of Santoshi Mata

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vinayaka Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, या शुभ मुहूर्तात पूजा केल्याने सर्व विघ्न टळतील

Hanuman Ji | हनुमानजींना संकटमोचन का म्हटलं जातं, जाणून घ्या

Follow Us
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?