AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Garud Puran : मृत्यूनंतर कसे असते यमलोक, गरूड पुराणात दिली आहे माहिती

गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्यानंतर त्याचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो. या प्रवासादरम्यान आत्म्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून जावे लागते आणि या काळात आत्म्याला जीवनात केलेल्या गुण-दोषांनुसार प्रवासात पुढे पाठवले जाते.

Garud Puran : मृत्यूनंतर कसे असते यमलोक, गरूड पुराणात दिली आहे माहिती
गरूड पूराणImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 09, 2023 | 12:12 PM
Share

मुंबई : गरुड पुराण (Garud Puran) हे हिंदू धर्मातील 18 महापुराणांपैकी एक आहे, जे एक प्रसिद्ध ग्रंथ मानले जाते. हे एकमेव ग्रंथ आहे ज्यामध्ये जीवन आणि मृत्यूनंतरच्या घटनांचे तपशीलवार वर्णन केले आहे. म्हणूनच सर्व पुराणांमध्ये त्याचे वेगळे आणि विशेष महत्त्व आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की मृत्यू हे जीवनाचे सर्वात मोठे आणि अंतिम सत्य आहे. गरुड पुराणात भगवान विष्णू आपले वाहन पक्षी राजा गरुड यांना मृत्यूशी संबंधित रहस्ये आणि मृत्यूनंतरच्या घटना सांगतात, जे गरुड पुराणात सांगितले आहे.

मृत्यूनंतरचा यमलोकाचा प्रवास कसा असतो

गरुड पुराणानुसार, मृत्यूनंतर आत्म्याला दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि त्यानंतर त्याचा यमलोकाकडे प्रवास सुरू होतो. या प्रवासादरम्यान आत्म्याला वेगवेगळ्या ठिकाणाहून जावे लागते आणि या काळात आत्म्याला जीवनात केलेल्या गुण-दोषांनुसार प्रवासात पुढे पाठवले जाते. गरुड पुराणानुसार, मृत्यूपूर्वी व्यक्तीचा आवाज कमी होतो आणि त्याची सर्व इंद्रिये बंद होतात. शेवटच्या क्षणी माणसाला ईश्वराकडून दिव्य दृष्टी प्राप्त होते आणि अशा प्रकारे तो जगाला वेगळ्या प्रकारे पाहू लागतो.

गरुड पुराणात असे सांगितले आहे की मृत्यूनंतर यमराजाचे दोन दूत मृत व्यक्तीचा आत्मा घेण्यासाठी येतात, ज्यांना पाहणे भयंकर असते. असे म्हणतात की मृत व्यक्ती आपल्या हयातीत जसे लोकांशी वागला तसे यमदूत आत्म्याशी वागतात. मृत व्यक्ती जर सत्‍य आणि सदाचारी व्‍यक्‍ती असेल तर त्‍याला प्राणत्‍याग करताना कोणतीही अडचण येत नाही आणि यमदूत देखील त्‍याला त्रास न देता यमलोकात घेऊन जातात.

दुसरीकडे, जर मृत व्यक्तीने आपल्या आयुष्यात पापकर्म केले असेल तर यमदूत त्यांना मोठ्या वेदना देतात, त्याच्या गळ्यात फास बांधतात आणि त्याला यमलोकात ओढतात. यासोबतच अशा लोकांच्या आत्म्यांना यमलोकात खूप त्रास दिला जातो.

यमलोकात पोहोचल्यानंतर, पुढील कार्ये पूर्ण करण्यासाठी आत्मा त्याच्या घरी परत सोडला जातो. आत्मा त्याच्या घरी परत येतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो पण पाशात बांधले गेल्याने तिला मोकळीक मिळू शकत नाही.

विधीच्या दहाव्या दिवशी जेव्हा कुटुंबातील सदस्य मृत व्यक्तीचे पिंडदान करतात तेव्हा आत्म्याला यमलोकात जाण्याचे सामर्थ्य मिळते आणि या दिवसांमध्ये आत्म्याचा आपल्या कुटुंबातील सदस्यांशी आणि जगाशी असलेला संबंध देखील संपतो.

यानंतर तेराव्या दिवशी यमदूत पुन्हा येतात आणि आत्म्याला यमलोकात घेऊन जातात, जिथे आत्म्याच्या कर्माचा लेखाजोखा मांडला जातो आणि त्यानुसार त्याला अर्ची मार्ग (स्वर्ग), धूम मार्ग (पितृ लोक) मार्ग मिळतो.  किंवा उत्पत्ती विनाश मार्ग (नरक) होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.