Lakshmi Jayanti 2021 | होलिका दहनापूर्वी देवी लक्ष्मीची श्रद्धा-भावाने पूजा करा, घरात संपत्ती नांदेल

फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला अत्यंत विशेष दिवस आहे. कारण, याच दिवशी देवी लक्ष्मी समुद्र मंथनदरम्यान प्रकट झाल्या होत्या (Goddess Lakshmi Jayanti 2021)

Lakshmi Jayanti 2021 | होलिका दहनापूर्वी देवी लक्ष्मीची श्रद्धा-भावाने पूजा करा, घरात संपत्ती नांदेल
Goddess Lakshmi

मुंबई : शास्त्रांमध्ये देवी लक्ष्मीला धनची देवी म्हटलं जातं. जर जीवनात आर्थिक समस्या दूर (Goddess Lakshmi Jayanti 2021) करायच्या असतील तर धनची देवी लक्ष्मीला प्रसन्न करणे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी उद्या (गुरुवार 28 मार्च) म्हणजेच फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला अत्यंत विशेष दिवस आहे. कारण, याच दिवशी देवी लक्ष्मी समुद्र मंथनदरम्यान प्रकट झाल्या होत्या (Goddess Lakshmi Jayanti 2021 On Holika Dahan 28th March Know The Shubh Muhurt And Puja Vidhi).

ज खूप मेहनत केल्यावरही जर तुम्हाला योग्य फळ मिळत नसेल आणि आर्थिक परिस्थिति दिवसेंदिवस ढासळत असेल तर 28 मार्चला होलिका दहनापूर्वी देवी लक्ष्मीची विधीवत पूजा करा आणि त्यांना आपले कष्ट दूर करण्याची प्रार्थना करा. श्रद्धाभावाने केलेल्या पूजेने देवी प्रसन्न होतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. त्यामुळे घरात नेहमी उन्नतीहोत असते आणि धन-धान्याची काहीही कमतरता भासत नाही.

शुभ मुहूर्त

🔷 पौर्णिमा तिथी सुरु : 28 मार्चला 3 वाजून 27 मिनिटांपासून

🔷 पौर्णिमा तिथी समाप्त : 29 मार्चला 12 वाजून 17 मिनिटांपर्यंत

देवी लक्ष्मी पूजा विधी

28 मार्चला पहाटे उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करा. एका पाटावर लाल वस्त्र पसरवा आणि देवी लक्ष्मीचा फोटो याप्रकारे ठेवा की पूजा करताना तुमचा चेहरा पूर्व दिशेला असले. देवी लक्ष्मीची पूजा जर नारायणसोबत केली तर त्या अत्यंत प्रसन्न होतात. त्यानंतर नारायणला पिवळं चंदन आणि देवीला रोली लावा. देवीला जल, सिंदूर, अक्षता, लाल पुष्प, वस्त्र, दक्षिणा, धूप-दीप, इत्र आणि खिरचा प्रसाद अर्पण करा. त्यानंतर लक्ष्मी चालीसा, मंत्र जप किंवा देवीच्या 1008 नावांचं उच्चारण करा. त्यानंतर आरती करुन नारायण आणि लक्ष्मीचा आशीर्वाद घ्या आणि प्रसाद वाटा.

या मंत्रांचा जप करा –

|| ॐ ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नम : ||

|| ॐ महालक्ष्मी च विद्महे, विष्णुपत्नीं च धीमहि, तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ||

|| पद्मानने पद्म पद्माक्ष्मी पद्म संभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् ||

|| ॐ धनाय नमः ||

पुजेसाठी शुभ मुहुर्त कोणता?

उद्या पूर्ण दिवस पौर्णिमेची तिथी राहील, अशात कुठल्याही वेळी देवी लक्ष्मीची पूजा केली जाऊ शकते. पण, सकाळी लवकर उठून देवीचं पूजन करणे अधिक चांगले असेल जेणेकरुन दिवसाची सुरुवात चांगली होईल. त्यानंतर सायंकाळी होलिका दहन करा.

देवी-देवता ते फक्त भक्तीचे भुकेले असतात. त्यामुळे देवाची पूजा करताना सर्वात जास्त महत्त्व श्रद्धेला आहे. त्यामुळे पूर्ण श्रद्धेने पूजा करा. जर श्रद्धा खरी असेल तर देवाचीही कृपाही तुमच्यावर नेहमी राहील.

Goddess Lakshmi Jayanti 2021 On Holika Dahan 28th March Know The Shubh Muhurt And Puja Vidhi

संबंधित बातम्या :

Holi 2021 | होलिका दहनाच्या राखेने घरात करा हे उपाय, सर्व संकटं होतील दूर…

Rang Panchami 2021 : देवी-देवतांच्या होळीचा दिवस म्हणजे रंगपंचमी, जाणून घ्या कधी आणि कुठे साजरी केली जाते…