AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lakshmi Jayanti 2021 | होळीसोबतच 28 मार्चला देवी लक्ष्मीचा प्रकट दिन, हे उपाय करा, आर्थिक समस्या सुटतील

दर वर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा प्राकट्य दिवस साजरा केला जाणार आहे (Goddess Lakshmi Jayanti On 28th March).

Lakshmi Jayanti 2021 | होळीसोबतच 28 मार्चला देवी लक्ष्मीचा प्रकट दिन, हे उपाय करा, आर्थिक समस्या सुटतील
Lakshmi
| Updated on: Mar 26, 2021 | 12:38 PM
Share

मुंबई : दर वर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला देवी लक्ष्मीचा प्राकट्य दिवस साजरा केला जाणार आहे (Goddess Lakshmi Jayanti On 28th March). मान्यता आहे की, याच दिवशी समुद्र मंथन दरम्यान देवी लक्ष्मी प्रकट झाल्या होत्या. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेच्या तिथीला 28 मार्चला 3 वाजून 27 मिनिटांपासून सुरु होईल आणि पुढील दिवशी ही 29 मार्चला 2 वाजून 17 मिनिटांपर्यंत असेल (Goddess Lakshmi Jayanti On 28th March 2021 Do These Upay To Get Rid Of Money Crisis).

मान्यता आहे की, लक्ष्मी जयंतीच्या दिवशी देवीची विधीविधानाने पूजा केल्याने त्या अत्यंत प्रसन्न होतात. देवी लक्ष्मी आपल्या भाविकांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. जर तुमच्या घरात पैशांची कमतरता असेल तर तुम्ही या दिवशी काही विशेष उपाय करुन देवी लक्ष्मीकडे आर्थिक संकट दूर करण्यासाठी साकडं घालू शकता. जाणून घ्या पूजा विधी आणि उपाय.

पूजा विधी

28 मार्चला पहाटे उठून स्नान करुन स्वच्छ वस्त्र परिधान करा. एका पाटावर लाल वस्त्र पसरवा आणि देवी लक्ष्मीचा फोटो याप्रकारे ठेवा की पूजा करताना तुमचा चेहरा पूर्व दिशेला असले. त्यानंतर देवीला जल, सिंदूर, अक्षता, लाल पुष्प, वस्त्र, दक्षिणा, धूप-दीप, इत्र आणि खिरचा प्रसाद अर्पण करा. त्यानंतर लक्ष्मी चालीसा, मंत्र जप किंवा देवीच्या 1008 नावांचं उच्चारण करा. त्यानंतर आरती करुन प्रसाद वाटा.

हे उपाय करा….

1. दक्षिणावर्ती शंखात जल भरुन देवीचा अभिषेक करा. देवीला शंख अतिप्रिय आहे. मान्यता आहे की शंख देवी लक्ष्मीचा भाऊ आहे कारण त्याचीही उत्पत्ती समुद्र मंथना दरम्यान झाली होती.

2. लक्ष्मी पूजनादरम्यान घरातील ईशान्यकोपऱ्यात गायाच्या दुधाने बनलेल्या तुपाचा दिला लावा आणि त्यामध्ये कलाव्याने तयार झालेली वात लावा आणि थोडं केशर टाका.

3. पूजेनंतर पाच किंवा सात कन्यांना देवीच्या प्रसादाची खीर प्रेमभावनेने खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा आणि सामर्थ्यानुसार वस्त्र इत्यादी दान करा. यामुळे देवी अत्यंत प्रसन्न होईल.

4. पूजेवेळी कौडी, केशर, हळकुंड आणि चांदीचे शिक्के सोबत ठेवून पूजा करा. त्यानंतर एका पिवळ्या वस्त्रात याला बांधून त्या स्थानी ठेवा जिथे धन ठेवलं जातं. याने मोठा फायदा होईल.

5. लक्ष्मी जयंतीच्या दिवशी पूजेनंतर शक्य असल्यास गरजुंना दान द्या. यामुळे देवी अत्यंत प्रसन्न होईल.

Goddess Lakshmi Jayanti On 28th March 2021 Do These Upay To Get Rid Of Money Crisis

संबंधित बातम्या :

Narasimha Dwadashi 2021: भक्त प्रल्हादप्रमाणे नरसिंह भगवान तुमचेही कष्ट हरतील, आज सायंकाळी पूजा करा…

Vastu Tips | घरात याप्रकारे करा ‘मोर’ पंखाचा वापर, आर्थिक समस्या, वैवाहिक जीवनातील तणाव होईल दूर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.