AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Grih Pravesh Rules: गृहप्रवेशाच्या वेळी हे नियम लक्षात ठेवा;घरात शांती आणि आनंद नांदेल

हिंदू धर्मात गृहप्रवेशाबाबत काही नियम दिले गेले आहेत. त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी काही खास मुहूर्त काढले जातात आणि त्यानुसार घरात प्रवेश केला जातो.

Grih Pravesh Rules: गृहप्रवेशाच्या वेळी हे नियम लक्षात ठेवा;घरात शांती आणि आनंद नांदेल
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 26, 2022 | 5:21 PM
Share

मुंबईः  हिंदू धर्मात गृहप्रवेशाबाबत (Grih Pravesh) काही नियम दिले गेले आहेत. तुमच्या नव्या घरात प्रवेश (Entry) करण्यापूर्वी काही खास मुहूर्त काढले जातात. आणि त्यानुसार घरामध्ये प्रवेश केला जातो. त्यामुळे हे गृहप्रवेशाचे नियम जाणून घ्या. स्वप्नातील घर बांधणे आणि नंतर ते सजवणे हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. पण स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर बांधणेच फक्त पुरेसे नाही. तर त्यामध्ये सुख-समृद्धी (Happiness Prosperity) असणेही गरजेचे आहे. घरात शांतता आणि माता लक्ष्मीचा वास असेल तेव्हाच माणूस सुखाने जगू शकतो.

काही खास मुहूर्त

हिंदू धर्मात गृहप्रवेशाबाबत काही नियम दिले गेले आहेत. त्यामुळे घरात प्रवेश करण्यापूर्वी काही खास मुहूर्त काढले जातात आणि त्यानुसार घरात प्रवेश केला जातो. त्यासाठी घरात प्रवेश करण्यापूर्वी, आपण गृहप्रवेशाचे काही नियम जाणून घेऊया, ज्यांचे पालन केल्यास त्याचा फायदा तुम्हाला होतो.

घरात प्रवेश करण्यापूर्वी हे महत्त्वाचे नियम

ज्योतिष शास्त्रानुसार घरात प्रवेश करण्यापूर्वी शुभ मुहूर्त काढला जातो, आणि तो महत्वाचा मानला जातो. असे मानले जाते की, रविवार आणि शनिवारी घरात प्रवेश करू नये.

होळीपूर्वी घरात प्रवेश करू नये

नवीन घरात गृहप्रवेश करण्यापूर्वी काही गोष्टी पाळल्या जातात. जसे की होळीपूर्वी घरात प्रवेश करू नये, असाही एक समज आहे. नवीन घरात पहिली होळी पेटवली जात नाही असंही मानलं जाते.

गृहप्रवेशासाठी सर्वोत्तम

दिवाळी आणि नवरात्रीच्या आधीचे दिवस गृहप्रवेशासाठी सर्वोत्तम मानले जातात.

कुटुंबीयांसह घरात प्रवेश करा

गृहप्रवेशाच्या दिवशी व्रत करावे. सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करून कुटुंबीयांसह घरात प्रवेश करावा असे सांगितले जाते.

– शुभ मुहूर्तावर फुल आणि तोरणांनी घर सजवा.

नवीन घरासाठी काय कराल

असे मानले जाते की घरात प्रवेश करण्यापूर्वी घराचा दरवाजा स्वच्छ आणि कोऱ्या कपड्याने झाकून टाका, आणि घरात कलश बसवा.

गृहप्रवेशाच्या वेळी सर्व प्रथम दाराची किंवा दरवाजाची पूजा करावी.

दाराच्या चौकटीच्या पूजेसाठी केवळ सौभाग्यवान महिला किंवा ब्राह्मणांनाच पुढे करावे असेही सांगितले गेले.

पती-पत्नीही एकत्र पुढे येऊ शकतात. दार किंवा दाराची पूजा केल्यानंतर दिक्पाल, क्षेत्रपाल आणि ग्रामदेवतेची पूजा करावी.

त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारातून घरात प्रवेश करावा

घरात प्रवेश करताना सर्वप्रथम उजवा पाय पुढे टाका.

या दिवशी घरी हवन करून नवग्रह शांती आवश्य करा.

असे मानले जाते की, या दिवशी घरातील गृहिणीने स्वयंपाकघरात प्रथम दूध उकळावे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.