Pandharpur: विठुरायाच्या भक्ताचा मनाचा मोठेपणा, विठ्ठलाच्या चरणी सोन्याचा करदोडा

Pandharpur: विठुरायाच्या भक्ताचा मनाचा मोठेपणा, विठ्ठलाच्या चरणी सोन्याचा करदोडा

बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील‌ श्री विठ्ठल भक्त राघव संजय जाधव यानी दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा 50 ग्राम वजनाचा सोन्याचा कंबरेचा करदोडा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस भेट दिलाय.

सिद्धी बोबडे

| Edited By: सिद्धेश सावंत

May 26, 2022 | 10:05 AM

पंढरपूर : पंढरपूरचा विठ्ठल (Vitthal) म्हणजे महाराष्ट्राचं आराध्यदैवत. विठूमाऊलीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी पंढरपूरला (Pandharpur) येत असतात. मात्र कोरोनामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून इथं भाविकांना येता आलेलं नाही. त्यामुळे मंदिरात येणारा देणगीचा ओघही कमी झाला होता. कोरोना काळामध्ये विठ्ठल मंदिर मागील अनेक महिन्यांपासून बंद होतं. परिणामी मंदिराला येणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी घट झाली होती. अशातच एका भाविकाने मनाची श्रीमंती दाखवली आहे.  दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा 50 ग्राम वजनाचा सोन्याचा कंबरेचा करदोडा मंदिर समितीला भेट दिला आहे. या भेटी मुळी विठ्ठल भक्तांच्या मनातील श्रीमंतीचे सर्वत्र कौतुक केलं जातंय.

मंदिर समितीच्या वतीने सत्कार

कोरोना नंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे देणगीचा ओघ वाढू लागला आहे.बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील‌ श्री विठ्ठल भक्त राघव संजय जाधव यानी दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा 50 ग्राम वजनाचा सोन्याचा कंबरेचा करदोडा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीस भेट दिल्याने .मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल भक्त राघव संजय जाधव यांचा सत्कार मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्री विठ्ठलाचि प्रतिमा देवून करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

विठ्ठल भक्तांच्या मनाची श्रीमंती

पंढरीचा विठ्ठल म्हणजे गोरगरीब, कष्टक-याचं श्रद्धास्थान. कोरोनामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घेता आलेलं नाही. मात्र दानाच्या बाबतीत मनाची श्रीमंती कुठंही कमी झालेली नाही. हेच बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथील‌ श्री विठ्ठल भक्त राघव संजय जाधव  या भाविकाच्या कृतीतून अधोरेखित झालंय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें