गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? गुढी कशी उभारायची? मुहूर्त आणि पूजाविधी एका क्लिकवर

गुढीपाडवा (Gudi Padwa) हा चैत्र महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण आहे. या सणापासूनन मराठी आणि कोंकणी लोकांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते.

गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? गुढी कशी उभारायची? मुहूर्त आणि पूजाविधी एका क्लिकवर
gudhipadwa
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 8:03 AM

मुंबई : गुढीपाडवा (Gudi Padwa) हा चैत्र महिन्यात येणारा एक महत्त्वाचा सण आहे. या सणापासूनन मराठी आणि कोंकणी लोकांच्या नवीन वर्षाला सुरुवात होते. हा सण महाराष्ट्र आणि गोव्यात शुक्ल पक्षाच्या चैत्र प्रतिपदा तिथीला हिंदू कॅलेंडरनुसार साजरा केला जातो. यावेळी गुढी पाडव्याचा सण 2 एप्रिलला (2 April) साजरा केला जाणार आहे. या दिवशी घरात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ बनवले जातात. भगवान ब्रह्मा (Bramha) आणि विष्णूची पूजा केली जाते. हिंदू धर्मात असे मानले जाते की चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. विशेषकरुन महाराष्ट्रात हिंदू नववर्ष हा गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. हा सण देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. कोंकणी लोक याला संवत्सर म्हणतात. कर्नाटकमध्ये हा सण युगाडी पर्व या नावाने ओळखला जातो, तर आंध्रप्रदेश, तेलंगाणामध्ये हा दिवस उगाडी, काश्मीरमध्ये ‘नवरेह’, मणिपूरमध्ये सजिबू नोंगमा पानबा या नावानं ओळखला जातो.

गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? महाराष्ट्रात गुढीपाडवा खासकरुन साजरा केला जातो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात. हा सण मित्र, कुटुंबातील सदस्यांसह आणि नातेवाईकांसोबत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या विशेष दिवशी पुरणाची पोळी आणि श्रीखंड बनवले जाते. याशिवाय, गोड भातही बनविला जातो. सूर्योदयाला भगवान ब्रह्माला या सर्व पदार्थांचं नैवेद्य दाखवलं जाते.

गुढीपाडव्याचे महत्त्व पौराणिक कथांनुसार, प्रतिपदेच्या तिथीला भगवान ब्रह्मा यांनी विश्वाची निर्मिती केली होती. या दिवशी भगवान ब्रह्माची विधीवत पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी पूजा केल्याने सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि घरात सुख-समृध्दी नांदते.

गुढीपाडव्याची तिथी आणि शुभ मुहूर्त गुढीपाडव्याचा उत्सव – 2 एप्रिल 2022

प्रतिपदा तिथीची सुरुवात – 2 एप्रिल 2021 ला 06:09am

गुढी पाडव्याची पूजा पद्धत 1. गुढी पाडव्याचं अनुष्ठान सूर्योदयापूर्वी केलं जाते. या दिवशी सकाळी उठून तेल लावून स्नान करावे.

  1. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याची पाने आणि फुलांनी सजविलं जातं.
  2.  यानंतर घराच्या एका भागात गुढी उभारली जाते. गुढीला आंब्याची पाने, नवे कपडे आणि फुलांनी सजावलं जाते.
  3.  नंतर लोक भगवान ब्रह्माची पूजा करतात.
  4.  गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची पूजा केली जाते.

गुढीपाडवा 2021 ची पूजा सामग्री ? तांब्याचा कलश

? नवीन कपडा

? आंब्याची पानं

? कडुलिंबाच्या पानांचा गुच्छा

? साखरेची गाठी

? फुलांचा हार

? लाकडी काठी

? तांदुळ आणि हळद

? कुंकू

? पान आणि सुपारी

? नारळ

? फळं

? उदबत्ती

? दिवा

गुढी कशी उभारावी – ? गुढीची उंच काठी बांबूपासून तयार केली जाते. काठीला स्वच्छ धुऊन त्या काठीच्या वरच्या भागाला रेशमी वस्त्र किंवा साडी गुंडाळतात.

? काठीला कडुलिंबाची डहाळी आंब्याची पाने, फुलांचा हार, साखरेची गाठी बांधून त्यावर तांबा, पितळ, किंवा चांदीचे गडू, तांब्या किंवा फुलपात्र बसविले जाते.

? ज्या भागाला गुढी उभारायची आहे, तिथली जागा स्वच्छ करुन धुऊन पुसून घ्यावी.

? त्यावर रांगोळी काढून पाट ठेवून गुढीची काठी ठेवावी.

? तयार केली गुढी दारात, उंच गच्चीवर, गॅलरीत लावावी.

? गुढीची काठी नीट बांधून काठीला गंध, फुले, अक्षता वाहून गुढीची पूजा करावी.

? निरंजन लावून उदबत्ती ओवाळावी.

? दूध साखर पेढ्यांचा नैवेद्य दाखवावं.

? दुपारी गुढीला गोडधोडाचे नैवेद्य दाखवावे.

? संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी परत हळद-कुंकू, फुले, अक्षता, वाहून गुढी उतरवावी.

संबंधीत बातम्या

Hindu New Year 2022 Horoscope | हिंदू नववर्षाला या 5 राशींच्या व्यक्तींवर पडणार पैशांचा पाऊस ! पुढील वर्ष जाणार आनंदात

कानडा राजा पंढरीचा, श्री विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पदस्पर्श दर्शनाची लगबग, मंदिर प्रशासनाची जय्यत तयारी सुरु

Mercury transit | सावधान ! बुध बदलणार आपली दिशा,12 एप्रिलपर्यंत या 3 राशींवर होणार वाईट प्रभाव!

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.