Hartalika 2024 : हरतालिका तृतीयेला 4 दुर्लभ योग, जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त

वैदिक पंचांगानुसार 5 सप्टेंबरला हरतालिका तृतीया आली आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिका साजरी केली जाते. या दिवशी हस्त नक्षत्राचा शुभ योग जुळून आला आहे. चला जाणून घेऊयात याबाबत

Hartalika 2024 : हरतालिका तृतीयेला 4 दुर्लभ योग, जाणून घ्या तिथी आणि शुभ मुहूर्त
Follow us
| Updated on: Sep 05, 2024 | 9:01 PM

भाद्रपद महिन्यातील तृतीयेला हरतालिका पूजन केलं जातं. वैदिक शास्त्रानुसार, या दिवशी देवी पार्वतीने महादेवांना प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. म्हणून या व्रताचं विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी महिला निर्जल व्रत करतात आणि शिव-पार्वतीची आराधना करतात. अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून व्रत करतात.या दिवशी महिला दिवशी पाणी आणि अन्नाशिवाय राहतात. या पूजेदरम्यान काही नियमांचं पालन करावं लागतं. या दिवशी खास योग जुळून आले आहेत. हरतालिका तृतीयेला हस्त नक्षत्रावर एक खास योग जुळून आला आहे. या नक्षत्रावर देवी पार्वतीने महादेवांसाठी व्रत ठेवला होता. हरतालिका तृतीयेला रवि योग, बुधादित्य योग तयार होतआहे. तसेच कन्या राशीत चंद्र आणि शुक्राची युती होत आहे. या युतीमुळे कलात्मक योग तयार झाला आहे. तर गुरु आणि चंद्रामुळे नवपंचम योग तयार होत आहे. वैदिक पंचांगानुसार, 5 सप्टेंबरला दुपारी 12 वाजून 22 मिनिटांनी तीथी सुरु होईल आणि 6 सप्टेंबरला दुपारी 3 वाजून 1 मिनिटांनी ही तिथी संपेल. उदय तिथीनुसार हरतालिका पूजन 6 सप्टेंबरला केली जाईल.

पंचांगानुसार, पुजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6 वाजून 1 मिनिटांनी सुरु होईल आणि 8 वाजून 33 मिनिटांपर्यंत असणार आहे. म्हणजेच पूजेसाठी 2 तास 31 मिनिटांचा मुहूर्त असणार आहे. त्याचबरोबर संध्याकाळी पूजेसाठी संध्याकाळी 5 वाजून 26 मिनिटांपासून 6 वाजून 36 मिनिटांपर्यंत असेल.

शास्त्रानुसार, तृतीयेचं महत्त्व सांगितले आहेत. हारतालिका पूजन करण्यासाठी ताटात कलश, बेलपत्र, केळीची पानं, शमीची पाने, धोतऱ्याचे फळ, सुके खोबरे, दुर्वा, गंगाजल, मध,तूप, चंदन, गुलाल, सुपारी यांचा समावेश करावा.विधीवत पूजा करून देवी पार्वतीला श्रृंगाराचं सामन अर्पण करावं. यामुळे दांपत्याच्या आयुष्या सुख समृद्धी येते आणि संकटं दूर होतात. या दिवशी दान केल्याने पुण्य मिळतं. गरजूंना मदत केल्याने या दिवशी उत्तम मानलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ...
आता लोकलमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास होणार आरामदायी, कारण ....
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ
मनसेच्या जय मालोकारचा मृत्यू नव्हे खून? पोस्टमार्टेम रिपोर्टनं खळबळ.
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख
मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी कोट तयार, आमदारान सांगितली निवडणुकीची तारीख.