चांगले ते रुजावे आणि वाईटाचा नाश व्हावा, होलिका दहनाचे महत्त्व तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या पूजा विधी

चांगले ते रुजावे आणि वाईटाचा नाश व्हावा, होलिका दहनाचे महत्त्व तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या पूजा विधी
holi

होळी (Holi) म्हणजे रंगांचा सण, फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते.

मृणाल पाटील

|

Mar 17, 2022 | 9:12 AM

मुंबई : होळी (Holi) म्हणजे रंगांचा सण, फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. होळी या सणाला महाराष्ट्रात शिमगा या नावाने ओळखतात. तर उत्तर भारतात (North India) याला दोला यात्रा किंवा होरी असे म्हटले जाते. दक्षिण भारतात हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करतात. 2022 मध्ये होलिका दहन 17 मार्च रोजी होणार आहे, हा दिवस गुरुवारी येतो. तर होळीचे रंग 18 मार्च (18 March) शुक्रवारी साजरे होणार आहेत. होळीच्या सणाच्या आधीच होलिकाष्टक होतात. जेव्हा होलिकाष्टक होते तेव्हा लग्न, मुंडण, लग्न, गृहप्रवेश इत्यादी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. होळीच्या दिवशी जी गोष्ट आर्वजून सांगितली जाते ती म्हणजे भक्तप्रल्हादाची आणि त्याच्या भक्तीची. हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने आपल्या मुलाचा आठ दिवस अनन्वित छळ केला होता. परंतु, भगवान विष्णूची अशी प्रल्हादावर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादाची आत्या होलिका तिच्या मांडीवर प्रल्हादा घेऊन जळत्या अग्नीत बसली होती. पण विष्णूच्या कृपेने होलिका मातेकडे जे वस्त्र होते त्यामुळे प्रल्हादचे प्राण वाचले आणि होलिका दहन झाली.

होलिका दहन लोकांसाठी का महत्त्वाचे आहे?

या दिवशी लोक होलिकाची पूजा करतात. हिंदू पौराणिक कथांमध्ये असे मानले जाते की होलिकाची पूजा केल्याने प्रत्येकाच्या घरात समृद्धी येते. लोकांचा असा विश्वास आहे की होलिका पूजन केल्यावर ते सर्व प्रकारच्या भीतीवर विजय मिळवू शकतात. चांगले ते रुजावे आणि वाईटाचा नाश व्हावा या उद्देशाने होलिका दहन केले जाते.

या पद्धतीने होलिका पूजन करा

होलिका दहनाच्या दिवशी नियमानुसार पूजा करावी. होलिका दहन हा एक विधी आहे जो अग्निसह केला जातो. लोक त्यांच्या कुटुंबीयांसह आणि मित्रांसह शेकोटीभोवती परिक्रमा करतात. फुले, अगरबत्ती, अक्षत, कापसाचा धागा, मूग डाळ, मिठाई किंवा बताशा, हळद, कुमकुम, नारळ, गुलाल आणि पाण्याने होलिकेची पूजा करा. पाच किंवा सात वेळा होळीच्या अग्न भोवती प्रदक्षिणा करून प्रार्थना करा. या दिवशी होलिकाची पूजा केल्याने सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदते अशी मान्यता आहे.

होलिका दहनाचा शुभ मुहूर्त कधी आहे ?

होलिका दहन 2022 तारीख आणि मुहूर्त जाणून घ्या
हिंदू कॅलेंडरनुसार, फाल्गुन पौर्णिमा 17 मार्च, गुरुवारी दुपारी 01:29 पासून सुरू झाली आहे, जी दुसर्‍या दिवशी, 18 मार्च शुक्रवारी रात्री 12:47 पर्यंत राहील. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन होते. अशा परिस्थितीत होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी १७ मार्च रोजी होणार असल्याने या दिवसाला छोटी होळी असेही म्हणतात.या वर्षी 17 मार्च रोजी होणाऱ्या होलिका दहनाचा शुभ मुहूर्त रात्री 09:06 ते 10:16 असा असणार आहे.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या :

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते कठीण काळात 5 गोष्टी देतील साथ, जाणून घ्या कोणत्या आहेत त्या गोष्टी

Holi 2022 | राशीनुसार रंगांनी खेळा होळी, जाणून घ्या कोणत्या गोष्टींचे दान केल्यास होईल शुभ

17 March 2022 Panchang: 17 मार्च 2022, होळीचे पंचांग, ​​शुभ मुहूर्त आणि राहुकाळ


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें