AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काळा धागा बांधण्यापूर्वी खबरदारी बाळगा, अन्यथा नुकसान होईल

तुम्ही अनेक लोकांना काळा धागा परिधान केलेले पाहिले असेल (How To Wear Black Thread). मान्यता आहे की, काळा धागा बांधल्याने वाईट नजर आणि शनि प्रदोषापासून वाचलं जाऊ शकतो. हा धागा पाय, मान, बाजू किंवा मनगटात बांधतात.

काळा धागा बांधण्यापूर्वी खबरदारी बाळगा, अन्यथा नुकसान होईल
black thread
| Updated on: May 08, 2021 | 3:23 PM
Share

मुंबई : तुम्ही अनेक लोकांना काळा धागा परिधान केलेले पाहिले असेल (How To Wear Black Thread). मान्यता आहे की, काळा धागा बांधल्याने वाईट नजर आणि शनि प्रदोषापासून वाचलं जाऊ शकतो. हा धागा पाय, मान, बाजू किंवा मनगटात बांधतात. हा धागा बांधण्याचे फायदे ज्योतिषशास्त्रात सांगितले गेले आहेत. काळा धागा बांधण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आपल्यासाठी हानिकारक ठरु शकते. काळा धागा बांधण्याशी संबंधित मान्यतांबाबत जाणून घेऊया (How To Wear Black Thread Know The Benefits And Consequences).

कुंडलीमधील शनिदोषातून मुक्तता मिळते

ज्योतिषानुसार, शनि हा काळ्या रंगाचा कारक आहे. शनिवारच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे काळा धागा बांधल्यास कुंडलीत शनिची स्थिती मजबूत होते. यामुळे शनिदोषातून स्वातंत्र्य मिळते. मान्यता आहे की, काळा रंग वाईट नजरेपासून संरक्षण करण्यास मदत करतो. म्हणूनच लोक काळा धागा बांधतात.

आर्थिक लाभ

मान्यता आहे की मंगळवारी काळा धागा बांधल्यास आर्थिक फायदा होतो. या दिवशी उजव्या पायात काळा धागा बांधल्यामुळे व्यक्तीच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येते.

निरोगी राहण्यासाठी काळा धागा बांधला

ज्योतिषशास्त्रानुसार काळा धागा बांधल्यामुळे माणसाचे आरोग्य सुधारते. विशेषत: ज्यांना पोटदुखीची समस्या आहे, त्यांनी पायाच्या अंगठ्यात काळा धागा बांधला पाहिजे. याशिवाय पायात काळा धागा बांधल्याने पाय दुखण्यापासून मुक्ती मिळते. लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी देखील काळा धागा बांधला जाते.

वाईट नजरेपासून सुरक्षा करते

लोकांच्या वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी काळ्या धाग्यात लिंबू आणि मिर्ची लावतात. मान्यता आहे की, असे करणे वाईट नजर लागत नाही. तुम्ही बऱ्याच घरांवर आणि दुकानांबाहेर तुम्ही काळ्या धाग्यातील लिंबू-मिर्ची पाहिली असेल.

काळा धागा बांधताना काळजी घ्या

ज्योतिषानुसार, जर काळा धागा बांधताना योग्य पद्धत वापरली नाही तर आपणास नुकसान होऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिवारच्या दिवशी काळा धागा बांधणे खूप शुभ असते. ज्योतिषातून अभिमंत्रित झाल्यानंतरच हा धागा धारण करा. या धाग्यासह शरीरावर कोणताही रंगाचा धागा असू नये. काळा धागा परिधान केलेल्या व्यक्तीने रुद्र गायत्री मंत्राचा जप करावा.

How To Wear Black Thread Know The Benefits And Consequences

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Bhaumvati Amavasya 2021 | कर्जातून मुक्तता हवी असल्यास भौमवती अमावस्येला ‘हे’ उपाय करा

Vaishakh Amavasya 2021 | पितरांच्या मोक्षसाठी, कालसर्प दोष मुक्तीसाठी वैशाख अमावस्येला ‘हे’ उपाय करा

लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?
अनिल परब शिवतीर्थवर राज ठाकरेंच्या भेटीला... कुठं ठाकरेंची युती होणार?.
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
मीराभाईंदरमधील इमारतीत शिरलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न.
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप.
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर.
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान.
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड
ठाकरे सेना अन् मनसेच्या युतीची घोषणा कधी? पुढील आठवड्यात मोठी घडामोड.