AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घराच्‍या टेरेसवर ‘या’ वस्तू असतील तर ताबडतोब काढा, नाहीतर..

वास्तुशास्त्रानुसार घराचे छत किंवा टेरेस/ गच्ची हे ऊर्जेचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. छतावर जर या वस्तू ठेवलेल्या असतील तर यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते, आर्थिक अडचणी, मानसिक ताण आणि कौटुंबिक कलह यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. चला तर मग वास्तूनुसार कोणत्या वस्तू टेरेसवरून काढल्या पाहिजेत ते जाणून घेऊयात.

घराच्‍या टेरेसवर 'या' वस्तू असतील तर ताबडतोब काढा, नाहीतर..
घराच्‍या टेरेसवर 'या' वस्तू कधीच ठेवू नका
| Edited By: | Updated on: Jul 15, 2026 | 12:11 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार घर बांधण्यापासून ते घरातील प्रत्येक दिशा प्रत्येक कोपरा आणि वस्तूला विशेष महत्त्व दिले जाते. शिवाय, ज्याप्रमाणे मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते, त्याचप्रमाणे घराच्या छतालाही एक महत्त्वाचे ऊर्जा केंद्र मानले जाते. प्रत्येकजण रोज घराची स्वच्छता करत असतात. पण कधी कधी आपण घराच्या छताकडे मात्र बरेच दिवस पाहत देखील नाही. त्यामुळे अनेकदा वस्तू वर्षानुवर्षे तिथेच पडून राहतात आणि कोणाच्या लक्षातही येत नाहीत.

अनेक लोकं घराच्या छतावर निरुपयोगी वस्तू जमा करतात, असा विचार करून की काही दिवसांनी त्या तुटलेल्या वस्तू विकल्या जातील किंवा टाकून दिल्या जातील. मात्र अनेकदा ती जागा साफ करायला विसरतात. वास्तुशास्त्रानुसार छतावर वापरत नसलेल्या वस्तू आणून ठेवल्याने वास्तूदोष निर्माण होऊ शकतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह तर वाढतोच, पण आर्थिक अडचणी, मानसिक ताण आणि कौटुंबिक कलह देखील निर्माण होऊ शकतात. चला तर मग घराच्या छतावर कोणत्या वस्तू ताबोडतोब काढून टाकणे योग्यतेचं ठरेल ते जाणून घेऊयात.

गच्चीवर जुने फर्निचर किंवा प्लास्टिकचे डबे ठेवू नका

अनेकजण आपल्या छताच्या कोपऱ्यात जुने फर्निचर, प्लास्टिकचे डबे किंवा इतर गोष्टी ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार छतावर वापरात नसलेल्या वस्तू ठेवल्याने संपत्तीची देवी लक्ष्मी क्रोधित होते. याचा परिणाम घरातील सुखसोयी, समृद्धी आणि आशीर्वादांवर होतो. तसेच यामुळे घरात येणाऱ्या पैशाच्या प्रवाहातही अडथळा निर्माण होतो.

छतावर गंजलेल्या वस्तू तशाच ठेवू नका

जुने लोखंडी भाग, यंत्रांचे तुकडे किंवा गंजलेल्या वस्तू छतावर कधीही उघड्यावर ठेवू नयेत. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तूंमुळे राहू आणि केतूचा नकारात्मक प्रभाव वाढतो, ज्यामुळे व्यक्तीच्या प्रगतीत अडथळा येऊ शकतो. जेव्हा एखादी व्यक्ती एखादे शुभ कार्य करण्याचा प्रयत्न करते, तेव्हा राहू आणि केतू त्यात अडथळा आणतात.

गच्चीवर सुकलेली झाडे आणि झाडू ठेवू नका

छतावर बागकाम करणे शुभ मानले जाते, परंतु तेथे लावलेली झाडे सुकून गेली असतील किंवा कोमेजली असतील तर ती ताबडतोब काढून टाकावीत. वास्तुशास्त्रानुसार सुकलेली झाडे नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत. साफसफाई केल्यानंतर झाडू किंवा केरसुणी छतावर कधीही सोडू नका. वास्तुशास्त्रानुसार, केरसुणी ही देवी लक्ष्मीचे प्रतीक मानली जाते, त्यामुळे ती घराबाहेर किंवा छतावर ठेवणे अशुभ मानले जाते.

(डिस्क्लेमर: या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांना अडवले
माढ्यात शेतकऱ्यांचे आंदोलन: मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर २ लाखांच्या कर्जमाफीची मागणी
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा...
Chinchpoklicha Chintamani | चिंचपोकळीच्या चिंतामणीचा फर्स्ट लुक समोर; पहा व्हिडीओ
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीचं भव्य स्वागत
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन! चिंपोकळीतील चिंतामणीच्या भव्य स्वागताचा व्हिडीओ समोर
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या, गुणरत्न सदावर्तेंचा आरोप
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या चुकीच्या आणि पूर्ण होऊ शकत नाहीत- गुणरत्न सदावर्ते
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अभिजीत दीपके यांचे समर्थन
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य
अशोक उईके: आदिवासी विद्यार्थ्यांची आंदोलने मागे, प्रमुख मागण्या मान्य; तीन महिन्यांनी पुन्हा चर्चा
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
सुभाष चंद्र यांचा रिलायन्स मीडिया नेटवर्कवर अफवा पसरवल्याचा आरोप
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स...
22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरून वाद; सुभाष चंद्रां आणि रिलायन्स मीडिया ग्रुप आमनेसामने
राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
Rahul Gandhi | राहुल गांधींचा भाजपवर हल्ला, खर्गेंच्या सभास्थळ शुद्धीकरणावर संताप
अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, केलं आवाहान...
Manoj Jarange Patil : अंतरावली सराटीतून मनोज जरांगेंचं मोठं विधान, प्रत्येक मराठ्याला केलं आवाहन