जर तुळस देत असेल हे चार संकेत, तर समजून जा लवकरच बदलणार आहे आयुष्य, होणार पैशांचा वर्षाव
हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार तुळस काही विशिष्ट संकेत देखील देते, या संकेताचा अर्थ तुमची लवकरच भरभराट होणार आहे, असा असतो.

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला पवित्र मानलं जातं, हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबाच्या घरासमोर आपल्याला तळशीचं झाड पाहायला मिळतं. तुळशीची केवळ पूजाच केली जात नाही तर घरात तुळस असण्याचे अनेक फायदे आहेत. तुळशीच्या रोपाला सकारात्मकता आणि शुद्धतेचं प्रतिक मानलं जातं. असं मानलं जात की ज्या घरामध्ये तुळशीचं झाड आहे, त्या घरावर सतत माता लक्ष्मीची कृपा राहाते. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा तुळशीचं झाड काही विशिष्ट संकेत देतं, तेव्हा असं समजलं जात की लवकरच घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी येणार आहे. घरामध्ये येणाऱ्या पैशांमध्ये देखील वाढ होणार आहे. काय आहेत नेमके हे संकेत जाणून घेऊयात.
तुळशीच्या पानांवर चमक – तुमच्या घरात लावलेली तुळस ही जर डेरेदार बनली, तिचे पानं हिरवे असतील आणि त्यावर तुम्हाला चमक पाहायला मिळाली तर समजून जा, लवकरच तुमचं भाग्य चमकणार आहे. घरात लवकरच सुख, शांती येणार आहे. कारण तुळशीच्या रोपामध्ये झालेले हे बदल सकारात्मक ऊर्जेचा संकेत देतात.
तुळशी भोवती फुलपाखरांचा संचार – जर तुम्हाला तुमच्या घरात तुळशी भोवती फुलपाखरं उडताना दिसले तर तो एक सकारात्मक ऊर्जेचा संकेत असतो. याचा अर्थ असा की तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा नाश झाला असून, सकारात्मक ऊर्जा तयार होत आहे. तुम्हाला तुमच्या सर्व कामांमध्ये यश मिळेल असा याचा अर्थ होतो, अशी मान्यता आहे.
सुगंध – तुळशीच्या रोपाला एक विशिष्ट प्रकारचा सुंगध असतो. जर तुम्हाला हा सुंगध तीव्र जाणवत असेल तर समजून जा तुमचं नशीब लवकरच चमकणार आहे. तुमच्या आयुष्यामध्ये काही तरी शुभ घडणार आहे.
उन्हातही झाड सुकत नसेल तर – तुम्ही तुमच्या घरात लावलेली तुळस जर कडाक्याच्या उन्हातही सुकत नसेल, ती डेरेदार आणि हिरविगार असेल तर तो एक अत्यंत शुभ असा संकेत असतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
