घरात असेल ‘शाळीग्राम’ तर ‘हे’ नियम कटाक्षाने पाळा, अन्यथा विपरित परिणाम होऊ शकतात

काळ्या रंगाचा गोल आणि गुळगुळीत दिसणारा दगड शाळीग्राम म्हणून ओळखला जातो (Know The Rules To Worship Shaligram).

घरात असेल 'शाळीग्राम' तर 'हे' नियम कटाक्षाने पाळा, अन्यथा विपरित परिणाम होऊ शकतात
Shaligram
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 3:40 PM

मुंबई : काळ्या रंगाचा गोल आणि गुळगुळीत दिसणारा दगड शाळीग्राम म्हणून ओळखला जातो (Know The Rules To Worship Shaligram). शाळीग्रामला भगवान विष्णूचं साक्षात स्वरुप मानलं जातं. मान्यता आहे की ज्या घरात भगवान विष्णू राहतात ते घर तीर्थक्षेत्राप्रमाणे असतं. पण, लेकिन शाळीग्रामच्या पूजेत काही विशेष खबरदारी बाळगावी लागते, नाहीतर घरात दोष लागतो आणि चांगलं आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गी लागतं. जर तुमच्या घरातही शाळीग्राम आहे तर या काही गोष्टी लक्षात ठेवा (If You Have Shaligram In Your House Then Know The Rules To Worship Shaligram Otherwise It May Be Harmful).

1. घराला पवित्र ठेवा आणि ज्या स्थानावर शाळीग्राम असले ते स्थान मंदिराप्रमाणे सजवा. आपले आचार आणि विचार शुद्ध ठेवा

2. शाळीग्रामच्या पूजेचा क्रमात खंड पडू देऊ नका. म्हणजेच नियमितपणे शाळीग्रामची पूजा करा. नियमितपणे शाळीग्राम महाराजला चंदन, पुष्प अर्पण करा. शक्य असल्यास दररोज एक तुळशीचं पानं अर्पित करा.

3. शाळीग्राम महाराजवर कधीही अक्षता अर्पण करु नका. शास्त्रांमध्ये याची मनाई आहे. पण जर तुम्ही असं करत असाल तर अक्षतांना हळदीत पिवळ्या करुन घ्या त्यानंतर अर्पण करा.

4. शाळीग्रामला नेहमी मेहनतीच्या कमाईतून मिळवलेल्या पैशांनी खरेदी करुन घरी आणा. कुठल्याही गृहस्थ व्यक्तीकडून शाळीग्राम घेऊ नये तसेच, कुठल्या गृहस्थ व्यक्तीला ते देऊ नये. पण, संत किंवना सिद्ध पुरुष तुम्हाला शाळीग्राम देतात तर त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता.

5. जर तुमच्या घरात शाळीग्राम असेल आणि तुम्ही त्याची व्यवस्थित पूजा करु शकत नसाल तर तुम्ही त्याला नदीत प्रवाहित केलेलं जास्त उत्तम ठरेल किंवा त्याला कुठल्या संताला द्या, नाहीतर तुम्हाला याचे विपरित परिणाम भोगावे लागू शकतात.

शाळीग्रामच्या नियमांचं पालन का करावं?

शाळीग्रामचा दगड ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक स्रोत मानला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते ज्याचा परिणाम घराच्या सभोवताल असतो. त्यामुळे घरात पवित्र आणि सकारात्मक वातावरण असणे महत्त्वाचं आहे. जर तुम्ही याला कुठल्याही प्रकारे दुषित करता तर त्याचा थेट परिणाम हा तुमच्या कुटुंबावर दिसेल. तसेच, गृहकलह आणि घटना-दुर्घटना वाढताील. चांगलं आयुष्य उध्वस्त होण्याच्या मार्गावर जाऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही शाळीग्रामच्या नियमांचं पालन करु शकत नसाल तर त्यांना घरात ठेवू नये.

नेपाळमध्ये मिळतो शाळीग्राम

हिंदू धर्मात देवाच्या मूर्तींची पूजा करण्याची पद्धत आहे. पण, या मूर्त्यांपूर्वी ब्रह्माजींना शंख, विष्णूंना शाळीग्राम आणि महादेवाला शिवलिंगाची रुपात आराधना केली जात होती. शिवलिंगप्रमाणे शाळीग्रामही अतिशय दुर्लभ असतं. हे जास्तकरुन नेपाळच्या मुक्तिनाथ क्षेत्र, काली गण्डकी नदीच्या तिरावर मिळतात. नेपाळच्या मुक्तिनाथ क्षेत्रात शाळीग्रामचं एकमेव मंदिर आहे.

If You Have Shaligram In Your House Then Know The Rules To Worship Shaligram Otherwise It May Be Harmful

संबंधित बातम्या :

Omkareshwar Temple : भगवान शंकराच्या दर्शनासाठी प्रकट झाली नर्मदा नदी, श्रद्धेची अनोखी कहाणी

Chanakya Niti : मन स्थिर नसेल तर आयुष्यात असंख्य अडथळे, वाचा काय आहे सुखी जीवनाचा मंत्र

Mahashivaratri 2021 | महाकालेश्वराची जगप्रसिद्ध ‘भस्म आरती’, वाचा कशी सुरु झाली ‘ही’ आरती…

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.